आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Indian Army Had Asked Soldiers On The Chinese Border To Delete 42 Chinese Apps After The Doklama Dispute In 2017.

अ‍ॅप्समुळे देशाची सुरक्षा धोक्यात:भारतीय लष्कराने 2017 मध्ये डोकलाम वादानंतर चीन सीमेवरील सैनिकांना 42 चायनीज अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले होते

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून-ऑगस्टमध्ये डोकलाम वाद झाला आणि नोव्हेंबरमध्ये संरक्षण मंत्रालयाने आदेश काढून चायनीज अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले

उपमिता वाजपेयी

सरकारने चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 2017 मध्ये डोकलाम वादादरम्यान संरक्षण मंत्रालयाने चीन सीमेवर तैनात सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना 42 चायनीज अ‍ॅप्स डिलीट करण्याचे आदेश दिले होते. या अ‍ॅप्समुळे देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगण्यात आले होते.

संरक्षण मंत्रालयाने 24 नोव्हेंबर 2017 ला एक आदेश जारी करुन 42 अ‍ॅप्स डिलीट करुन फोन फॉर्मॅट करण्यास सांगितला होता.

इंटेलिजेंस इनपुट 

2017 मध्ये जून ते ऑगस्टपर्यंत भारत आणि चीनदरम्यान डोकलाम वाद सुरू होता. यादरम्यान, चीनी अ‍ॅप्ससंबंधित इंटेलिजेंस इनपुट मिळाली होती. यानंतर हे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले होते. डोकलाममध्ये चीन सीमेजवळ एक रस्ता बनत होता. भारतीय सैनिकांनी हे काम थांबवले होते.

2017 मध्ये संरक्षण मंत्रालयाकडून जारी लिस्टमध्ये 42 अ‍ॅप्स होते. यात वीबो, वी चॅट मैसेन्जर, शेअरइट आणि यूसी ब्राउजरदेखील सामील होते. सोमवारी ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, त्यात हे नावही सामील आहेत. यावर्षी जूनच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने एक अ‍ॅडवायजरी जारी केली होती. याला रॉ (रिसर्च अ‍ॅड अ‍ॅनॉलिसिस विंग) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनायजेशन (एनटीआरओ) च्या इनपुटच्या आधारावर तयार केले होते. ज्या अ‍ॅप्सला सरकारने बंदी घातली आहे, त्यात अॅंटी व्हायरस आणि ब्राउजरदेखील सामील आहेत.

2017 मध्ये या 42 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती

बीगो लाइव, वी चॅट, शेअर इट, ट्रू कॉलर, यूसी न्यूज, यूसी ब्राउसर, ब्यूटी प्लस, न्यूज डॉग, पॅरलेल स्पेस, वीवा वीडियो, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सिक्योरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर,क्यू क्यू प्लेयर,क्यू क्यू म्यूजिक, क्यू क्यू न्यूजफीड, एप्यूस ब्राउसर, परफेक्ट कॉर्फ, वायरस क्लीनर, सीएम ब्राउसर, एमआय कम्युनिटी, डीयू रिकॉर्डर, वॉल्ट हाइड, यूकँप मेकअप, एमआय स्टोर, कॅचे क्लीअर डीयू ऐप स्टूडियो, डीयू क्लीनर, डीयू ब्राउजर, डीयू प्राइवेसी, डीयू बैट्री सेवर, 360 सेक्यूरिटी, क्लीन मास्टर, बॅदू ट्रांसलेट, बॅदू मॅप, वंडर कॅमरा, ईएस फाइल एक्सपोलरर, फोटो वंडर, क्यू क्यू मेल,मेल मास्टर,एमआय व्हिडिओ कॉल, सेल्फ सिटी, वी सिंक, हे अॅप्स आहेत.

2015 मध्येही उचलले होते पाऊल

डिसेंबर 2015 मध्ये संरक्षण मंत्रालयाने चीनच्या हॅकर्सकडून धोका असल्याचे सांगत, दिल्लीतील साउथ ब्लॉक हेडक्वार्टरमध्ये वाय फाय आणि ब्लू टूथ डिवाइसच्या वापरावर बंदी लावली होती. सिंगापूरच्या एका कपंनीने चीनी बगने भारतीय नौसेनेतील युद्धपोतच्या साउथ चाइना सीमध्ये मूवमेंट आणि चीन सीमेसंबंधी माहिती लीक होण्याचा धोका सांगितला होता. चीनी फोनच्या वाढत्या वापरानंतर भारतीय सैन्याने सांगितले होते की, या फोनमध्ये काही प्रीइंस्टॉल अॅप्स असतात,त्यांना डिलीट करता येत नाही.

भारत सरकारने सोमवारी या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे

टिकटॉक, शेयरइट, केवई, यूसी ब्राउजर, बॅडू मॅप, शीईन, क्लॅश ऑफ किंग, डीयू बॅटरी सेवर, हेलो,लाइकी, यूकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राउजर, वायरस क्लीनर, एपीयूएस ब्राउजर, रोमवी, क्लब फॅक्ट्री, न्यूज डॉग, ब्यूटी प्लस, वीचॅट, यूसी न्यूज, क्यू क्यू मेल, वीबो, एक्सएंडर, क्यू क्यू म्यूजिक, क्यू क्यू न्यूजफीड, बीगो लाइव, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पैरलर स्पेस , एमआई वीडियो कॉल-शियॉमी, वीसाइन ईएस फाइल एक्सप्लोरर, वीवा वीडियो ,मीईटू, वीगो वीडियो, न्यू वीडियो स्टेटस , डीयू रिकॉर्डर , वॉलट हाइड, कैचे क्लीयर डीयू ऐप स्टूडियो , डीयू क्लीनर, डीयू ब्राउजर, हगो प्ले विद न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चीता मोबाइल, वंडर कैमरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेयर, वी मीट, स्वीट सेल्फी, बॅडू ट्रांसलेट, वी मेट , क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सिक्योरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू वीडियो , वी फ्लाई स्टेटस वीडियो, मोबाइल लिजेंड्स, डीयू प्रायवेसी.