आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑक्सफर्ड विद्यापीठाने आपली काेरोनावरील लस यशस्वी असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार ही लस ५६ ते से ६९ वयोगटातील लोक तसेच ७० पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांवरही ९९ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत आहे. ही लस अॅस्ट्राझेनेका कंपनीसोबत तयार केली जात आहे. भारतात तिचे उत्पादन सीरम इंडियाकडून केले जात आहे. लसीच्या संशोधनाबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाचा हा दावा ‘लॅन्सेट’ मासिकात प्रकाशित झाला आहे. ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे सदस्य डॉ. महेशी रामासामी म्हणाले, ‘आमची लस वयोवृद्धांवरही प्रभावी ठरत असल्याचा आनंद आहे. लसीने तरुणांतही तशाच पद्धतीची राेगप्रतिकारशक्ती विकसित केली आहे.’ दुसऱ्या टप्प्यात ५६० निरोगी लोकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस वृद्धांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे समजले जाते.
तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षही लवकरच
सध्या ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष समोर आले आहे. तिच्या तिसऱ्या टप्प्यातीलही चाचण्या सुरू आहेत. लवकरच त्याचा अहवाल येणार आहे. तेव्हाही ही लस इतकीच प्रभावी ठरली तर ती आजवरच्या सर्व लसींत सर्वाधिक उपकारक ठरेल. अाजवर फायझरची लस ९०%, रशियाची ९२, मॉडर्नाची ९४.५ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे सांगितले गेले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.