आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Interest Waiver Scheme Should Be Implemented By November 5; RBI's Instructions To All Banks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोरॅटोरियम योजना:व्याजावर व्याजमाफीची योजना 5 नोव्हेंबरपर्यंत लागू करावी; भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या योजनेअंतर्गत कर्जाच्या व्याजावरील व्याज 1 मार्च 2020 पासून सहा महिन्यांसाठी माफ होणार

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकतीच जाहीर व्याजमाफी योजना येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत लागू करा, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व कर्जदाता संस्थांना मंगळवारी सांगितले आहे. या योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावरील व्याज १ मार्च २०२० पासून सहा महिन्यांसाठी माफ केले जाणार आहे.

सरकारने पात्र कर्ज खात्यांसाठी चक्रवाढ व्याज व साधारण व्याजामधील फरकाच्या पेमेंटवर अनुदानाची योजना २३ ऑकटोबरला जाहीर केली होती. सरकारने सर्व बँकांना ५ नोव्हेंबरपर्यंत चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील फरक कर्जधारकांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले होते.

बँकांना केंद्राकडून निधी

सुप्रीम कोर्टात केंद्राने सांगितले की, मोरॅटोरियम योजनेत २ कोटींपर्यंतचे कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजावर व्याज आणि सामान्य व्याजातील फरकाची रक्कम ५ नोव्हेंबरपर्यंत खात्यात जमा होईल. बँका ही रक्कम केंद्र सरकारकडून घेतील. केंद्राने आपल्या शपथपत्रात कोर्टाला सांगितले की, ही योजना अर्थ मंत्रालयाने आणली आहे.