आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Interval Between The Two Doses Of Covishield May Be 16 Weeks Instead Of 8; The Vaccine Can Also Be Given To Pregnant Women

लसीकरण:कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 8 ऐवजी 16 आठवडे होऊ शकते; आता गर्भवतींना सुद्धा घेता येणार लस

पवनकुमार | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सल्लागार समूहाच्या शिफारशी सरकारने मान्य केल्यास पुन्हा लसीकरणाचा प्रोटोकॉल बदलणार

कोरोनापासून बचावासाठी लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावे, यासाठी लवकरच प्रोटोकॉलमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. कोविड-१९ वरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटागी) याबाबत काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने त्या मान्य केल्यास कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला ६ महिन्यांनी लस टोचली जाईल. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील सध्याचे ६-८ आठवड्यांचे अंतर वाढवून १२-१६ आठवडे केले जाईल. या शिफारशींवर लवकरच निर्णय होऊ शकतो.

एनटागीच्या ७ शिफारशी, ज्यामुळे लसीकरण आणखी परिणामकारक ठरणार

1.कोरोनाग्रस्त रुग्णास तो बरा झाल्याच्या ६ महिन्यांनी लस द्यावी. सध्या बाधित व्यक्तीला बरे झाल्याच्या १४ दिवसांनी लस दिली जाऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे शरीरात तयार होणाऱ्या नैसर्गिक अँटिबॉडीची क्रियाशीलता वाढू शकते. 2.पहिल्या डोसनंतर बाधा झाल्यास बरे झाल्याच्या ४ ते ८ आठवड्यांनंतर लसीचा डोस द्यावा. सध्या अशा रुग्णांनाही बरे झाल्याच्या १४ दिवसांनी दुसरा डोस टोचला जात आहे. अँटिबॉडीची क्रियाशीलता पाहूनच हीदेखील शिफारस करण्यात आली आहे. 3.जर रुग्णाला उपचार सुरू असताना प्लाझ्मा दिला असेल तर तो बरा झाल्याच्या किमान १२ आठवड्यांनी लस देण्याची परवानगी दिली जावी. सध्या अशा रुग्णांसाठी कोणताही वेगळा नियम नाही. तेही बरे झाल्याच्या १४ दिवसांनी लस घेत आहेत. 4.कोरोनाशिवाय कुणी इतर गंभीर आजारामुळे रुग्णालय वा आयसीयूमध्ये भरती झाल्यास बरे झाल्याच्या किमान ४-८ आठवड्यांनी लस द्यावी. सध्या त्याचा वेगळा प्रोटोकॉल नाही. तज्ज्ञांनुसार, एखादा साइड इफेक्ट होऊ नये म्हणून अंतर राखणे चांगलेच आहे. 5.लसीकरण केंद्रावर लस देण्याआधी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याची गरज नाही. अनेक ठिकाणी या प्रोटोकॉलमुळे लसीकरण केंद्रावर उगाच गर्दी वाढते. अनेकदा लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना घरी गेल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून बाधा होते.

6.कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १८ आठवड्यांचे केले जावे. सध्या कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ८ आठवड्यांचे आहे. लॅन्सेटनुसार, १२ आठवड्यांच्या अंतरामुळे लस ८१.३% पर्यंत प्रभावी होते. यामुळे ब्रिटनमध्येही कोविशील्डच्या (ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेेनेका) दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवले जात आहे. 7.गरोदर महिला नियमित तपासणीसाठी अँटिनेटल सेंटरमध्ये (एएनसी) गेली तर तिला लस घेण्याचे फायदे आणि संभाव्य तोटेही सांगितले जावेत. गरोदर महिलांना साइड इफेक्ट्सचे बुकलेट दिले जावे आणि लस घेण्याचा पर्यायही ठेवला जावा. देशात आजवर गर्भवती आणि स्तनदा मातांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

पुढे काय?
एनटागीच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन ऑन कोविड -१९ कडे (नेगव्हॅक) जाईल. नेगव्हॅकचा निर्णय व त्यांच्या शिफारशीनंतर त्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवल्या जातील. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय शेवटचा निर्णय घेईल. यात १-२ दिवस लागू शकतात.

बातम्या आणखी आहेत...