आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Issue Of Giving Leadership To The Party Outside The Gandhi Family Will Be Discussed In The Congress Thinking Camp

चिंतन शिबिर:गांधी परिवाराबाहेर पक्षाचे नेतृत्व देण्याविषयी काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा होणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने १३ मेपासून तीनदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर राजस्थानातील उदयपूर येथे होणार आहे. त्यात गांधी परिवाराबाहेरील नेत्याकडे पक्षाची धुरा देण्याविषयी चिंतन होणार आहे. त्याशिवाय पक्षीय फेररचना, बळकटीकरण यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे. शिबिरात ध्रुवीकरण, आघाडीची स्थापना इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे.

त्यातून तोडगा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. देशात काँग्रेसची स्वबळावरील सत्ता केवळ दोन राज्ये व १०० वर लोकसभा-राज्यसभा सदस्यांपुरती मर्यादित राहिली आहे. देशात काँग्रेसची पीछेहाट होत आहे. ही बाब पक्षासाठी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आगामी शिबिराला महत्त्व आले आहे.पक्षांतर्गत पातळीवर आवश्यक बदल करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. चर्चेतून तोडगा काढला जाणार आहे. त्यासाठी उदयपूर घोषणापत्र तयार केले जाणार आहे. त्यास नवसंकल्प घोषणापत्र असे संबोधले जाणार आहे. त्याद्वारे राजकीय, सामाजिक, आर्थिक, संघटनात्मक, कृषी इत्यादी क्षेत्रातील प्रश्न व त्याविषयी पक्षाची जबाबदारी याद्वारे कार्याची दिशा ठरवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...