आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये डॉक्टरांनी पायाच्या हाडापासून नवीन जबडा तयार करून चार वर्षांच्या जेनाब हिला नवे आयुष्य दिले आहे. मुलीला जबड्याचा कर्करोग होता. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या चार डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या या प्रकारच्या पहिल्याच शस्त्रक्रियेसाठी नऊ तास लागले. मुलीच्या पायाचे हाडही लहान होते म्हणून आधी करवतीने पायाचे हाड कापण्यात आले आणि नंतर त्याला जबड्याचा आकार देण्यात आला. एक मिमी एवढे जरी अंतर कमी जास्त झाले असते तर नवीन तयार केलेला जबडा मुलीच्या तोंडात बसवणे शक्य झाले नसते. यामुळे शस्त्रक्रिया करताना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यात आली. हाड कापून काढणे आणि पाय चांगला करण्यासाठी टायटेनियमच्या चार प्लेट तसेच १२ ते १६ स्क्रू आधी लावण्यात आले.
शस्त्रक्रियेच्या वेळी केसाएवढ्या बारीक तीन रक्तवाहिन्या गळा व मेंदूशी यशस्वीपणे जोडण्यात आले, म्हणजे रक्ताचा प्रवाह सुरळीत सुरू राहील. अशा पद्धतीने जेनाबला नवे आयुष्य मिळाले. खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी ८ ते १० लाख रुपये खर्च आला असता. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. हेमंत सरवैया, डाॅ. प्रीतम आणि डॉ. उमांक त्रिवेदी व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया मोफत केली. लवकरच जेनाबवर फिजिअोथेरपी सुरू केली जाईल आणि नवीन दातही बसवले जाणार आहेत.
चेहरा बिघडू नये आणि जेवताना आयुष्यभर त्रास होऊ नये याची काळजी घेतली
जुनागडच्या जेनाबवर मायक्रो वास्क्यूलर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. हेमंत सरवैया यांनी सांगितले की, कॅन्सरग्रस्त जबडा काढला गेला नसता तर मुलीच्या तोंडातून शरीराच्या इतर भागात कॅन्सर गेला असता. म्हणून कॅन्सरग्रस्त भाग काढून तो पुन्हा नव्याने लावण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. लहानशी चूक जरी झाली असती तर चेहरा बिघडण्याची आणि दात एकमेकांसमोर बसले नसते तर मुलीला आयुष्यभर तरल खाद्यपदार्थांवर अवलंबून राहण्याची वेळ आली असती. रुग्णालयाचे संचालक डॉ. शशांक पंड्या यांनी सांगितले, गुजरात सरकारच्या सहकार्याने येथे कॅन्सरच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.