आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराद केरल स्टोरी या चित्रपटाशी संबंधित वाद दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना, या फिल्मच्या एका क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे की, 'घराबाहेर पडू नको. ही कथा चित्रपटाद्वारे मांडून तुम्ही चांगले केले नाही.'
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. पण लेखी तक्रार प्राप्त न झाल्याुळे या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आला नाही.
केरल स्टोरी चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी
द केरल स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कुणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे.
यासंबंधीची खालील बातमी वाचा...
'द केरल स्टोरी' चित्रपटाची खरी कहाणी:हजारो हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारून सीरियात पाठवल्याची चर्चा कशी सुरू झाली?
'द केरल स्टोरी' हा चित्रपट त्याची कथा आणि दाव्यांमुळे चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर 26 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट 4 मुलींच्या जीवनावर आधारित आहे. 2 मिनिट 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 4 महाविद्यालयीन मुली दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामील होतात हे दाखवण्यात आले आहे.
ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते, ज्यामध्ये ती दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्याची संपूर्ण कहाणी सांगत आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की एक टोळी केरळमधील मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेचा भाग बनवते. यासाठी कधी शारीरिक संबंध, तर कधी धार्मिक श्रद्धा हे साधन म्हणून वापरले जातात.
हा ट्रेलरचा विषय झाला. 'द केरल स्टोरी' चित्रपटात केलेले आरोप सिद्ध करणाऱ्याला एका मुस्लिम संघटनेने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 5 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनपासून ते शशी थरूरपर्यंत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.