आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Killing Of Farmers Is Absolutely Reprehensible, But Every Such Incident Should Be Condemned; Statement By Finance Minister Nirmala Sitharaman

अर्थमंत्र्यांचे वक्तव्य:शेतकऱ्यांची हत्या पूर्णपणे निषेधार्हच, मात्र अशा प्रत्येक घटनेचा निषेध व्हावा; वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचे वक्तव्य

नवी दिल्ली/ लखनऊ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाने फेटाळला.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी हिंसाचाराचा प्रतिध्वनी अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांना हिंसाचारावर प्रश्न विचारण्यात आला. उत्तरात सीतारमण यांनी हिंसाचार पूर्णपणे निषेधार्ह ठरवला. त्या म्हणाल्या, भारताच्या अन्य भागांतही अशा प्रकारच्या घटना होतात. मात्र, या घटनेचा मुद्दा घटना घडली त्याच वेळी उचलला गेला पाहिजे. एखाद्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने काही लोकांना असा मुद्दा उचलणे अनुकूल वाटते, अशी भूमिका नसली पाहिजे. हार्वर्ड केनेडी स्कूलमधील चर्चेदरम्यान त्यांना विचारले की, मोदी व अन्य मंत्र्यांकडून या हिंसाचारावर काही प्रतिक्रिया कशी आली नाही. ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एका वाहनाने काही शेतकऱ्यांना चिरडले होते. यात चौघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर लोकांनी चौघांची हत्या केली होती.

मिश्राचा जामीन फेटाळला
प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाने फेटाळला. मिश्रा ३ दिवस एसआयटी कोठडीत आहे. दुसरीकडे, कोर्टाने अन्य एक आरोपी शेखर भारतीला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. त्याला मंगळवारी अटक केली होती. आशिष मिश्राचा मित्र अंकित दास एसआयटीसमोर हजर झाला.

काँग्रेस नेत्यांची राष्ट्रपतींशी चर्चा
राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...