आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Lancet Wrote,Prime Minister Modi's Work Is Unforgivable, He Should Take Responsibility For The Mistakes In Corona Epidemic,"

रिसर्च जर्नलची रिपोर्ट:लेंसेटने लिहीले- पंतप्रधान मोदींचे काम माफ करण्यायोग्य नाही, कोरोनावरील चुकांची जबाबदारी त्यांनी घ्यावी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धार्मिक आयोजन आणि निवडणूक सभा कशासाठी ?

मेडिकल रिसर्च जर्नल 'द लेंसेट' ने आपल्या एका संपादकीयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर कठोर शब्दात टीका केली आहे. जर्नलने लिहीले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम माफ करण्यायोग्य नाही. मागच्या वर्षी कोरोना महामारीत केलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनाची दुसरी लाट भारतात आली, या दरम्यान झालेल्या चुकांसाठी मोदींनी आपल्या चुकांची जबाबदारी घ्यावी.

धार्मिक आयोजन आणि निवडणूक सभा कशासाठी ?

द इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनच्या संपादकीयच्या हवाल्यातून अंदाज लावण्यात आला की, भारतात यावर्षी 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे दहा लाख रुग्णांचा मृत्यू होईल. असे झाल्यास, मोदी सरकार यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल. कारण, कोरोनाच्या सुपर स्प्रेडरमुळे नुकसान होणार, असे माहित असतनाचाही सरकारने धार्मिक आयोजनांना परवानगी दिली, निवडणूक सभा घेतल्या.

टीका रोखण्यात सरकार गुंतले

जर्नलने पुढे लिहीले की, मोदी सरकार कोरोना महामारीला नियंत्रित करण्याऐवजी ट्विटरवर होत असलेल्या टीकांना रोखण्यात गुंतले होते. जर्नलने भारत सरकारच्या व्हॅक्सीन पॉलिसीवरही टीकास्त्र सोडले. यात म्हटले- सरकारने राज्यांसोबत चर्चा केल्याशिवाय अचानक लसीकरण सुरू केले आणि यामुळे 2% पेक्षा कमी लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे.

आरोग्य यंत्रणेवर उपस्थित केले प्रश्न

जर्नलने भारताच्या आरोग्य यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले. यात म्हटले की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळत नाहीये, त्यांचा मृत्यू होतोय. मेडिकल टीमदेखील आता थकली आहे. सोशल मीडियावर व्यवस्थेमुळे त्रस्त झालेलो लोक मेडिकल ऑक्सीजन, बेड, वेंटिलेटर आणि औषधांच्या मागण्या करत आहेत.

माहिती असूनही सरकारने दुर्लक्ष केले

लेंसेटने पुढे म्हटले की, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मार्चच्या आधीच महामारी संपली असल्याची घोषणा करतात. केंद्र सरकारने चांगल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला हरवले. पण, दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची माहिती असूनही सरकारने दुर्लक्ष केले.

व्हॅक्सीन पॉलिसीवरही निशाणा
सरकारने मागच्या वर्षी कोरोनाच्या सुरुवातीला चांगले काम केले आणि कोरोना नियंत्रणात आणला. पण, दुसऱ्या लाटेत खुप चुका केल्या. सरकारने आता पुन्हा पारदर्शकपणे काम करायला हवे. संपादकीयमध्ये केंद्र सरकारला दोन पद्धतीने रणनिती आखण्याचा सल्ला दिला आहे. पहिला- भारताने लसीकरण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आखून वेगाने पुढे न्यायला हवा. दुसरा- सरकारने जनतेला योग्य आकडेवारी द्यावी.

बातम्या आणखी आहेत...