आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैदिक मंत्राेच्चार आणि हर हर महादेवच्या जयघोषात जम्मू बेस कॅम्पवरून ४८९० यात्रेकरूंची पहिली तुकडी बुधवारी बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाली. सायंकाळी उशिरा ही तुकडी बेस कॅम्पवर पोहोचली. तेथून गुरुवारी सकाळी अमरनाथ यात्रा सुरू होईल. तेथील लंगर समित्या सर्वाधिक कार्यमग्न आहेत. त्यांचे कर्मचारी बर्फासारख्या थंड पाण्यात भाजी स्वच्छ करत आहेत. दुसरीकडे स्वयंपाकी त्या शिजवून भाविकांना भाेजन देत आहेत. जालंधरहून येऊन लंगर सुरू केलेले राजकुमार कवी सांगतात की, गर्दी सुरू झाली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढत जाईल. राजकुमार २३ वर्षांपासून येथे लंगर सेवा देतात. ते म्हणतात की, दोन वर्षांनंतर पुन्हा इथे आल्याने मी खूप उत्साहित आहे. आम्ही १६ जूनला येथे आलो. त्यानंतर तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे लंगरसाठी पायाभूत सुविधा उभारताना खूप मेहनत घ्यावी लागली. पुढील दीड महिना लंगर चालवण्यासाठी त्यांनी ७ ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू आणल्या आहेत. त्यांच्यासोबत ५० जण अाहेत.
श्री अमरनाथ देवस्थान मंडळाच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांबाबत राजकुमार म्हणाले की, या वर्षी त्यांनी सर्व नियम बदलले. पूर्वी आम्ही खूप वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायचाे. पण या वर्षी तळलेले पदार्थ आणि फास्ट फूडवर बंदी आहे. आम्ही डाळ-भात, डाळ-रोटी, रुमाली रोटी, तंदुरी रोटी, मसुराचे पदार्थ आणि हिरव्या भाज्या बनवतो. शिव-पार्वती सेवा दलाचे (चंदीगड) राजेंद्रसिंह सामंत यांनी १६ व्या वर्षी येथील डोमेलमध्ये लंगर लावला अाहेे. ते सांगतात, “या वेळी इथल्या सुविधा खूप चांगल्या आहेत. पाणी, वीज आणि मोबाइलला रेंज आहे. नवीन रस्तेही बांधले, त्यांचे रुंदीकरणही झाले. भाविकांच्या सोयीसाठी संपूर्ण मार्गावर पथदिवे असून दोन्ही मार्गांवर १२० लंगर आहेत.
ते सर्व दररोज एक लाख भाविकांसाठी अन्न शिजवतील. या लंगरमध्ये भाविक, सुरक्षा दलाचे कर्मचारी तसेच प्रशासनाचे कर्मचारीही भोजन करतात. अशा रीतीने हा प्रवास मार्ग देशातील सर्वात माेठे सामूहिक स्वयंपाकघर ठरेल. ते २४ तास चालू ठेवण्यासाठी बेस कॅम्पमध्ये रेशन आणि एलपीजी सिलिंडरचा माेठा साठा केलेला आहे. काही लंगर समित्यांनी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ऑटोरिक्षाही आणल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या परिसरात स्वच्छता हे देवस्थान मंडळासमोरील मोठे आव्हान आहे. बालटाल बेस कॅपचे संचालक एन. एस. जामवाल म्हणतात की स्वच्छता कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करतील. या मार्गावर २१ स्थायी आणि ७०० फिरती शौचालये आहेत. बालटाल ते डोमेलदरम्यान २०० कचराकुंड्या अाहेत. घन व ओल्या कचऱ्याची राेज विल्हेवाट लावण्यासाठी ३५० कर्मचारी तैनात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.