आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Largest Nursery In The Country At 10 Thousand Acres In Kadima In Andhra Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद:10 हजार एकरात देशातील सर्वात मोठी नर्सरी आंध्र प्रदेशातील कडियममध्ये; 10 लाखांपर्यंतची रोपटी, रोज 5 कोटींचा व्यवसाय

राजमुंदरी / ताराचंद गवारिया10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमारे 1 लाख लोकांना मिळाला रोजगार; दुबई, दोहा, चीन आणि स्पेनपर्यंत व्याप्ती

आंध्र प्रदेशातील राजमुंदरीहून १५ किमीवर कडियम भाग आहे. रस्त्यासोबत वाहणाऱ्या कालव्याच्या दोन्ही बाजूंना रोपांच्या हजारो नर्सरी दिसतात. २५ किमी परिघात सुमारे ६००० फार्महाऊसमध्ये रोपे तयार होतात. ५० गावांतील १० हजार एकर जमिनीत पसरलेला हा बाजार लाॅकडाऊनमध्ये बंद होता. आता येथे पुन्हा पूर्वीचे वैभव आले आहे. ट्रकमधून रोपे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात जाऊ लागली आहेत. येथील श्रीसत्यनारायण नर्सरीचे संचालक ताताजी सांगतात, १९५९ मध्ये सुरुवात झाली तेव्हा परिसरात ३ किंवा ४ नर्सरी होत्या. हळूहळू गावातील लाेक या व्यवसायात उतरले आणि आज हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. श्रीलक्ष्मी व्यंकेश्वरा नर्सरीचे श्रीनिवास सांगतात की, हे येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. १ लाख लोकांना यात रोजगार आहे. येथून दुबई, कतार, चीन आणि स्पेनपर्यंत रोपटी पाठवली जातात. आधी रोज ५ कोटी रुपयांचा व्यवसाय व्हायचा, मात्र लॉकडाऊनमुळे ६०% नुकसान झाले. पूर्वी रोज ५०० गाड्या जात, आता ५० ते ८०च जातात. परदेशातून येणाऱ्या रोपट्यांमध्ये चायना बोन्साय (१-७ लाख) व स्पेनचे गुडलक प्लँट ओलियाला (१० लाख रु.) मागणी आहे. थायलंडमधून रंगीत बोगनवेलीचीही आयात केले जाते.

या बोन्सायची किंमत ७ लाख, फाइव्ह स्टार हॉटेलची शोभा वाढवतेछायाचित्र चायना बोन्सायचे आहे. याची किंमत बोन्सायच्या आकारावरून ठरवली जाते. ती १ ते ७ लाखांपर्यंत असते. हॉटेल्स आणि लग्न समारंभात सजावटीसाठी त्याची मागणी असते. २५ हजार किमीत पसरलेली कडियम मंडळातील ही नर्सरी. येथून रोज ५०-८० ट्रक रोपटी देशातील विविध राज्यांत जातात.

बातम्या आणखी आहेत...