आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Largest Temple In The World Is Being Built In Bengal For One Thousand Crores, Lord Krishna Will Be Seated

जन्माष्टमीस भव्य आयोजन:बंगालमध्ये एक हजार कोटींत तयार होतेय जगातील सर्वात मोठे मंदिर, भगवान कृष्ण विराजमान होणार

ग्राउंड रिपोर्ट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठ्या मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर येथील इस्कॉनच्या मुख्यालयात २००९ पासून मंदिराचे काम सुरू आहे. ७०० एकरमध्ये (२८ लाख चौरस मीटर) पसरलेले हे जगातील सर्वात मोठे मंदिर असेल. आतापर्यंत सर्वात मोठे मंदिर म्हणून कंबोडियातील अंगकोर वाटजवळील ओळखले जायचे, जे १६ लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. मायापूरमध्ये बांधल्या जाणाऱ्या मंदिराचे उद्घाटन २०२३ मध्ये होळीच्या दिवशी प्रस्तावित होते. पण कोरोनामुळे उशीर झाल्यामुळे आता २०२४ पर्यंत ते होऊ शकते. मंदिराचा पाया १०० फूट म्हणजे जमिनीत दहा मजली इमारतीच्या बरोबरीने असून यावरून मंदिराच्या आकाराचा अंदाज लावता येतो. येथे वापरल्या जाणाऱ्या टाइल्स राजस्थानातील धौलपूर तसेच व्हिएतनाम, फ्रान्स, दक्षिण अमेरिका येथून आणल्या आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी दहा हजार लोकांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेता येणार आहे. या वेळी १९ ऑगस्टला जन्माष्टमी येथे थाटात साजरी केली जाणार आहे. परिसरामध्ये एक चित्ररथ काढण्यात येणार आहे. यात एक लाखाहून अधिक भक्त सहभागी होतील. हॉटेल्समध्येही आगाऊ बुकिंग आहेे.

इस्कॉन मायापूरचे टीओव्हीपी सदस्य इष्ट देव म्हणतात की ५०० वर्षांपूर्वी नित्यानंद प्रभूंनी येथे एका अद्भुत मंदिराची भविष्यवाणी केली होती. इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांनी १९७१ मध्ये तीन एकर जमीन खरेदी केली होती. १९७२ मध्ये भूमिपूजन झाले आणि २००९ मध्ये बांधकाम सुरू झाले. सुरुवातीच्या बजेटनुसार मंदिर ६०० कोटी रुपयांमध्ये बांधले जाणार होते, परंतु कोरोनामुळे आणि त्यानंतर वाढलेल्या खर्चामुळे बजेट एक हजार कोटींंवर पोहोचले आहे. कार निर्माता कंपनी फोर्डचे मालक अल्फ्रेड फोर्ड यांनी ३०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे जगातील सर्वात मोठे वैदिक मंदिरदेखील असेल, जिथे फक्त देवाचा निवास असेल.

शहरात निनादते ‘हरे कृष्ण’ची धून, लोकही हरे कृष्णने संबोधित करतात
मंदिराबाहेर फक्त हरे कृष्णाची धून ऐकू येते. शहरात जेवढी चाट, मोमोज, फास्ट फूडची दुकाने दिसतात, त्या सर्वांवर प्रसादम लिहिलेले असते. लसूण-कांदा वापरला जात नाही. खरेदीदार आणि दुकानदार ‘हरे कृष्ण' म्हणत संबोधतात. राज्य सरकारने मायापूर येथील विमानतळाचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे दिला आहे. जमिनीचा शोध सुरू आहे. एखाद्या मंदिरासाठी विमानतळ बांधण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.

बातम्या आणखी आहेत...