आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्फस्तान:‘चिल्लई कलां’च्या शेवटच्या रात्री काश्मीरमध्ये थंडीचा 30 वर्षांचा विक्रम मोडला; गोठलेले झरे-बर्फ पाहण्यासाठी रोज हजारपेक्षा जास्त पर्यटक येत आहेत

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये ‘चिल्लई कलां’च्या शेवटच्या रात्री थंडीचा ३० वर्षांचा विक्रम मोडला. येथे तापमान उणे ८.८ अंश सेल्सियस होते. याआधी १९९१ च्या जानेवारीत सर्वात कमी उणे ११.३ अंश तापमान होते. त्यामुळे ९०% घरांतील नळांत पाणी गोठले. हवामान विभागाचे संचालक सोनम लोटस म्हणाले की, पुढील २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत प्रचंड बर्फवृष्टी होऊ शकते. रविवारपासून २० दिवसांचा चिल्लई खुर्दचा काळ सुरू झाला आहे.

काश्मिरी कॅलेंडरनुसार, थंडीच्या तीव्रतेच्या बाबतीत हे ४० दिवस चिल्लई कलांनंतर दुसऱ्या स्थानी आहेत. म्हणजे आता यानंतर हाडे गोठवणारी थंडी नसेल हे निश्चित आहे. यंदा काश्मीरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली. ती पाहण्यासाठी दररोज १००० पेक्षा जास्त पर्यटक येत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आनंदी आहेत. फोटोः आबिद भट

बातम्या आणखी आहेत...