आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Lawyer Was Pleading In Two Courts Simultaneously; Toca Said Telling Me Something

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:माय लाॅर्ड, तुम्ही माझ्याशी बाेलत हाेता का? नाराज सरन्यायाधीश म्हणाले, ‘नाही, भिंतीशी बाेलत हाेताे’

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वकील एकाच दिवसात वेगवेगळ्या न्यायालयांसमाेर खटले लढवताना दिसून येतात. एका न्यायालयातील खटला निपटताच दुसऱ्या काेर्टात हजर हाेऊन ते युक्तिवाद करतात. डिजिटल माेडमध्ये व्हिडिआे काॅन्फरन्सिंगने सुनावणी हाेत असल्याने वकील असे करणे कठीण हाेत आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या काेर्टातील सुनावणी सुरू हाेते. परंतु एका वकिलाने गुरुवारी डिजिटल माेडमध्येही जुना फाॅर्म्युला वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले. हे वकील एकाच वेळेत दाेन संगणकाच्या साहाय्याने दाेन न्यायालयासमाेर बाजू मांडत हाेते. त्यावर सरन्यायाधीश रमणा नाराज झाले. त्यांनी वकिलास फटकारले. दाेन वेगवेगळ्या खटल्यात सदर वकिलास हजर व्हायचे हाेते. एक खटला सरन्यायाधीश रमणा यांच्या पीठासमाेर सुरू हाेता, तर दुसरा अन्य पीठासमाेर हाेता. वकिलासमाेर दाेन काॅम्प्युटर स्क्रीन लावलेले हाेते. त्याद्वारे वकील दाेन्ही काेर्टाच्या समक्ष हाेते.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या काेर्टात सुनावणी सुरू हाेताच वकील महाेदय त्याच वेळी दुसऱ्या पीठासमाेर युक्तिवाद करत हाेते. त्यांनी स्वत:ला म्यूट किंवा स्क्रीन आॅफही नव्हता. त्यामुळे इतर पीठासमाेरील युक्तिवाद सरन्यायाधीशांसमक्षही एेकू येत हाेता. त्यावर रमणा म्हणाले, आपसात काही बाेलू इच्छित असल्यास बाहेर जा. तेथे चर्चा करा. पण वकीलांनी युक्तिवाद सुरूच ठेवले. हा नियमभंग आहे, असे म्हटल्यावर कुशवाह यांचे लक्ष गेले आणि त्यांना चुकीची जाणीव झाली. वकिलांनी विचारले, माय लाॅर्ड, तुम्ही माझ्याशी काही बाेलत आहात का? रमणा संतापले. ते म्हणाले, नाही. आम्ही तर भिंतीशी बाेलत आहाेत. त्यावर माय लाॅर्ड, तांत्रिक त्रुटीमुळे हे झाले. मला माफ करा, असे वकिलांनी कबुल केले.

काेराेना काळात जलदगती निवाड्याची सूचना नाही
काेराेना महामारीमुळे परिस्थिती वाईट आहे. कनिष्ठ न्यायालयात जलदगतीने न्यायदानाचा आदेश देता येऊ शकत नाही. देशावर संकटाचा काळ आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर हायकाेर्टासमाेर हा मुद्दा मांडता येईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...