आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

56 काश्मिरी पंडित कर्मचारी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर:अतिरेक्यांच्या हाती लागली पंडितांची यादी, भाजपची चौकशीची मागणी

वृत्तसंस्था | श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीर खोऱ्यात सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या ५६ काश्मिरी पंडितांची यादी लीक झाली असून ती अतिरेक्यांच्या हाती लागली आहे. ही यादी अतिरेकी संघटनेशी संबंधित ब्लॉगवर शेअर केली जात असून काश्मिरी पंडितांना धमकावले जात आहे. भाजपने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. २०१० पासून पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत ५००० पंडितांची भरती करण्यात आली आहे. आधीपासूनच खोऱ्यात निशाणा बनवून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे.

लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संघटना द रेझिस्टन्स फ्रंटच्या (टीआरएफ) ब्लॉग लिंकवर काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची यादी शेअर करण्यात आली. या यादीत ५६ काश्मिरी पंडितांची नावे असून ते पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत काम करत आहेत.

चौकशी करा : भाजप भाजप प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी यादी लीक झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते पोलिसांना म्हणाले, ही यादी कशी काय लीक झाली, याची चौकशी करण्यात यावी. काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी चौकशी आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...