आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Lure Of Admission To The Preferred Medical College In 15 Lakhs, News And Live Updates

इन्व्हेस्टिगेशन:15 लाखांत पसंतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना येतात फोन

सीकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर बनायचे असेल तर आधी 50 हजार, बाकीची रक्कम निकालानंतर

राजस्थानमध्ये आता गुण वाढवणे अाणि पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. टोळीतील लोक १५ लाख रुपयांत प्रवेशापर्यंतची पूर्ण प्रक्रिया करून देण्याची हमी देत अाहेत. नीट व्यवस्थापनाने मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही टोळीच्या जाळ्यात अडकू नये, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. अलीकडे नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मोबाइलवर गुण वाढवण्यासाठी आणि इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ऑफर येत आहेत.

पालकांकडून मिळालेल्या क्रमांकावर भास्करच्या वार्ताहराने पालक बनून संवाद साधला असता या टाेळीचा संपूर्ण प्रकार उघडकीस अाला. हा सर्व प्रकार महाराष्ट्रातून कार्यान्वित हाेत असल्याचे समाेर अाले. टाेळीचे लाेक अाधी विद्यार्थ्यांचे दस्तएेवज मागवताता. त्यानंतर ५० हजार रुपयांत प्रवेशाची जागा निश्चित करण्याचे अाश्वासन देऊन ही रक्कम अागाऊ मागवतात. हमीसह काम करण्याचे आश्वासन देतात. यासाठी प्रवेशानंतर उर्वरित १४.५० लाख रुपये देण्यासाठी ते सांगतात. संवाद झाल्यानंतर टोळीने विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची यादी व्हॉट्सअॅपवर वार्ताहराला पाठवली.

असा केला टाेळीचा पर्दाफाश - पैसे व कामाची काय हमी ? उत्तर मिळाले - ७ वर्षे काम करताेय, दरवर्षी अाम्ही २० प्रवेश करताे

वार्ताहर : टाेळीच्या ८३५००२४०४९ क्रमांकावर काॅल केला.
टाेळी : हॅलाे... मी माेहित शर्मा बाेलत असून पुण्याचा अाहे. अाम्ही निकालात फेरफार करून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो.
वार्ताहर : गुणांत फेरफार कसा हाेईल ? प्रवेशाची काय हमी ?
टाेळी : मुलाला किती गुण मिळालेत. जर विद्यार्थ्याला २५० गुण मिळालेले असतील तर अाम्ही ६५० पर्यंत करून देऊ. श्रेणीनिहाय प्रवेश हाेतात.
वार्ताहर : किती लागतील, हमी काय?
टाेळी : आम्ही आधी पैसे घेत नाही. कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला फक्त ५० हजार रुपये आगाऊ भरावे लागतील. निकालानंतर बँकेत १४.५० लाख रुपये जमा करावे लागतील.
वार्ताहर : मला जोधपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल का?
टाेळी : तुम्ही कोणतेही कॉलेज निवडू शकता. त्यातच प्रवेश दिला जाईल.
वार्ताहर : जोधपूर मेडिकल कॉलेजमध्ये सामान्य श्रेणीमध्ये किती गुण आवश्यक असतील?
टोळी: तुम्ही दोन मिनिटे थांबा ... यासाठी ६२० गुण आवश्यक असतील. जर मुलाला इतके गुण मिळाले नसतील तर आपण ते अाम्ही भरून देऊ
वार्ताहर : प्रश्न : नीट पेपर राजस्थानमध्ये फुटला. काही गडबड झाली तर?
टाेळी : तुमचा निकाल एनटीएच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. समुपदेशनाद्वारे तुम्हाला प्रवेश मिळेल. निकालानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील. मग गडबड कशी होईल?
वार्ताहर : रक्कम जास्त अाहे. दाेन विद्यार्थ्यांसाठी कमी हाेऊ शकते का ?
अामचे शुल्क ठरलेले अाहे. कमी-जास्त हाेणार नाही. मग एक विद्यार्थी असाे की ५० विद्यार्थी. सगळ्यांसाठी एकच शुल्क अाहे. अाम्ही सात वर्षांपासून काम करत अाहाेत. दरवर्षी २० ते २५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देताे.

प्रश्न : विद्यार्थ्यांची नावे, क्रमांक, गुण टोळीपर्यंत कसे पोहोचतात?
नीट एनटीएद्वारे घेतली जाते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची नावे, क्रमांक, पत्ते यासारखी गोपनीय कागदपत्रे टोळीपर्यंत कशी पोहोचतात, हा प्रश्न आहे. टोळीचे लोक नीट दिलेल्या विद्यार्थ्यांना वा पालकांनाच बोलावतात.

विद्यार्थ्यांनी फसवणुकीला बळी पडू नये
विद्यार्थ्यांनी फसवणुकीच्या कॉल्सला बळी पडू नये. परीक्षेनंतर गुणांची हेराफेरी करण्यासारखे काहीच नाही. फसवणुकीचे कॉल विद्यार्थ्यांना अाले तर त्यांनी सावध राहिले पाहिजे, कोणत्याही प्रकारे फसवणूक करून घेऊ नका. अशी प्रकरणे एनटीएला genadmin@nta.ac.in या ईमेलद्वारे कळवली जाऊ शकतात. बनावट लोकांवर कारवाई केली जाईल. - अशोक गुप्ता, राज्य समन्वयक, एनटीए

त्यामुळे ही भीती...
नीटची प्रश्नपत्रिका जयपूरच्या परीक्षा केंद्रातून व्हॉट्सअॅपद्वारे फुटली. अभ्यासात कमी हुशार असलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बाेगस परीक्षार्थी बनवण्याचा प्रकार घडला. अशा स्थितीत गुणांची फेरफार करण्याचे प्रकार नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...