आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Maharashtra Government Did Not Pay Salaries To Health Workers And Doctors On Time, The Center Informed The Supreme Court

पगार:आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना महाराष्ट्र सरकारने वेळेत वेतन दिलं नाही, सर्वोच्च न्यायालयाला केंद्राने दिली माहिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. अशा वेळी कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे दिसतं आहे. मात्र असे असतानाही महाराष्ट्र सरकारने डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला नसल्याची माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही माहिती देत महाराष्ट्रासोबत पंजाब, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचाही उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोनाच्या लढाईत सहभागी आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत मिळेल याची काळजी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

एका डॉक्टरने याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याने क्वारंटाइनमध्ये असल्यास त्या दिवसांमधील वेतन कपात केली जात असल्याची तक्रार केली होती. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.