आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेल्टा व्हेरिएंट संसर्ग:कोरोना लस घेतल्यानंतर संसर्ग झालेले बहुतांश रुग्ण डेल्टाचे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना लस घेतल्यानंतर आढळलेल्या संसर्गाच्या (ब्रेकथ्रू) प्रकरणांत बहुतांश रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. सार्स सीओव्ही २ जीनोमिक कन्सॉर्टियमने (आयएनएसएसीओजी) ही माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंट, संवेदनशील लोकसंख्या आणि लसीचा प्रभाव कमी होणे ही कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होण्याची कारणे आहेत, हे कन्सॉर्टियमने मान्य केले. डेल्टा सध्या भारतात प्रमुख चिंताजनक व्हेरिएंट आहे.

संस्थेने १६ ऑगस्टला नवीन बुलेटिन जारी केले. त्यात म्हटले आहे की, आम्ही व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टच्या व्हेरिएंटच्या ३०,२३० नमुन्यांचे सिक्वेन्सिंग केले. त्यापैकी २०,३२४ डेल्टाची होती. डेल्टा व्हेरिएंटची ६१ प्रकरणे आतापर्यंत भारतात आढळली आहेत. संस्थेच्या मते, गंभीरपणे आजारी पडण्यापासून रोखण्यासाठी आणि मृत्यू होणे रोखण्यासाठी लसीकरण खूप प्रभावी ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...