आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Market Cap Of Group Companies Is Close To 11 Lakh Crores, Gautam Adani, Mukesh Ambani, Adani Group, Jeff Bezos, Reliance Shares

13 व्या क्रमांकावर पोहोचले अदानी:​​​​​​​ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 11 लाख कोटींच्या जवळपास, पुन्हा परतले शेअर्सचे दिवस

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर त्यांचे एकूण मूल्यांकन 10.95 लाख कोटी रुपये झाले. यातील 3 कंपन्या 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे आहेत.

अदानीच्या रँकिंगमध्ये सुधारणा
शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली. आता ते जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. आतापर्यंत ते 14 व्या क्रमांकावर होते. अदानी ग्रीन एनर्जीचे सर्वाधिक मार्केट कॅप आहे जे 2.65 लाख कोटी रुपये आहे. तर अदानी ट्रान्समिशनचे 2.21 लाख कोटी रुपये आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे मूल्यांकन 2.05 लाख कोटी रुपये आहे. अदानी टोटल गॅसचे मार्केट कॅप रु. 1.98 लाख कोटी आहे.

11व्या क्रमांकावर मुकेश अंबानी
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी हे जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची संपत्ती 7.28 लाख कोटी रुपये आहे. तर अदानी यांची संपत्ती 6.56 लाख कोटी रुपये आहे. डॉलरच्या बाबतीत, दोघांमधील फरक सुमारे 9.5 अब्ज डॉलर आहे. अलीकडच्या काळात गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.

यामध्ये अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांचे शेअर्स आता एका वर्षाच्या उच्चांकाच्या जवळ आहेत. त्यामुळे अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीतही वाढ झाली आहे.

गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यावर भर
अलीकडेच अंबानी आणि अदानी यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. मुकेश अंबानी गुजरातमधील हरित ऊर्जा आणि इतर प्रकल्पांवर पुढील 10-15 वर्षांत 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यामध्ये जिओ, रिटेलसह इतर सेगमेंटवर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्यात स्टील प्लांट उभारण्यासाठी अदानी समूहाने दक्षिण कोरियाच्या पॉस्को कंपनीसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार केला आहे.

अदानी यांनी कमाईत बेझोसलाही मागे टाकले
या वर्षी आतापर्यंत अदानींनी कमाईच्या बाबतीत जेफ बेझोस, अंबानी आणि इतरांना मागे टाकले आहे. अदानी यांनी या वर्षात शुक्रवारपर्यंत 9.07 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 70 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वॉरेन बफे यांनी या कालावधीत केवळ7.34 अब्ज डॉलर आणि मुकेश अंबानी यांनी 6.80 अब्ज कमावले आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनी केवळ 1.68 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...