आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Meeting Was Held Under 'BJP Ko Jano' Program And A Short Film Related To BJP Was Also Shown

नड्डा यांनी 13 देशांच्या राजदूतांची घेतली भेट:'भाजपा को जानो' कार्यक्रमांतर्गत बैठक, भाजपशी संबंधित लघुपटही दाखवला

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज 'भाजपा को जानो' या कार्यक्रमांतर्गंत 13 देशातील राजदूतांशी चर्चा केली. आज संध्याकाळी चार वाजता भाजपच्या दिल्लीच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली. यात भाजप प्रमुखांसह यूके, स्पेन, फिनलंड, क्रोएशिया, सर्बिया, नेपाळ, थायलंड, मॉरिशस आणि जमैका यांच्यासह 13 विदेशी राजदूत सहभागी झाले होते.

'भाजपा को जानो' या कार्यक्रमाची सुरुवात भाजपच्या स्थापना दिनी म्हणजेच 6 एप्रिल 2022 रोजी करण्यात आली होती. नड्डा यांनी आतापर्यंत 34 देशांच्या राजदूतांशी 3 बैठका घेतल्या आहेत. या कार्यक्रमात 150 हून अधिक देशांच्या राजदूतांशी संपर्क साधण्याची भाजपची योजना आहे. या कार्यक्रमात जेपी नड्डा विदेशी राजदूतांना पक्षाचा इतिहास आणि त्याचा प्रवास सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 1951 पासूनच्या प्रवासावर एक लघुपटही तयार करण्यात आला आहे, जो प्रत्येक बैठकीत राजदूतांना दाखवला जातो.

13 आणि 15 जून रोजी जेपी नड्डा आफ्रिकन, पूर्व आशियाई, आखाती, सीआयएस आणि उत्तर अमेरिकन देशांतील राजदूतांना भेटतील. मागील बैठकीत नड्डा यांनी लाओस, रशिया, क्युबा, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कस्तानच्या राजदूतांशी चर्चा केली होती. भाजपचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला जगभरात ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत परदेशातील राजदूतांना पक्षाचा इतिहास सांगणे आवश्यक आहे.

भाजपच्या परराष्ट्र व्यवहार शाखेचे प्रमुख विजय चौथाईवाले भाषणानंतर म्हणाले की, "नरेंद्र मोदी सरकारच्या काळात भारताची जागतिक ओळख वाढली आहे आणि पक्षाच्या इतिहासाची आणि दूरदृष्टीची दूतांना ओळख करून देण्याची गरज आहे." पक्ष आणखी दूतांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. "आम्ही या महिन्यात तीन किंवा चार संवाद सत्रे घेणार आहोत. पक्ष-पक्ष संवाद वाढवण्याची योजना देखील आहे," असे चौथाईवाले म्हणाले.

आजच्या कार्यक्रमात जेपी नड्डा यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठौर, गुरु प्रकाश पासवान, पक्षाचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले आणि इतर काही दिग्गज नेतेही होते. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये चौथाईवाला यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाची सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...