आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख वार्ता:प्रथमच दल सरोवरावर कसरती दाखवतील मिग-21 व सुखोई-30, तरुणांना हवाई दलाकडे आकर्षित करण्यासाठी खोऱ्यात 26 तारखेला होणार एअर शो

श्रीनगर / मुदस्सीर कुल्लू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 आदिवासी तरुणांना दिले जाणार मोफत वैमानिक प्रशिक्षण

एकेकाळी दहशतवाद्यांच्या भयाने सुन्न होणारे श्रीनगरचे प्रख्यात दल सरोवर आता २६ सप्टेंबरला एक वेगळाच नजारा सादर करणार आहे. केंद्रशासित प्रदेशाचे सरकार श्रीनगरमध्ये आपला पहिला एअर शो आयोजित करत आहे. राज्यातील तरुणांना विमानन क्षेत्र व हवाई दलाकडे आकर्षित करण्यासाठी हा शो घेतला जात आहे.

या एअर शोला ‘आजादी का महोत्सव’ नाव देण्यात आले आहे. त्यात दल सरोवरावर आकाशात सूर्यकिरण विमानांच्या कलाबाजींसोबतच मिग-२१ बायसन व सुखोई-३० लढाऊ विमानांचे फ्लायपास्टही होणार आहे. यासोबतच पॅरामोटर, पाॅवर्ड हँड-ग्लायडर आणि आकाशगंगा स्काय डाइव्हिंग टीमचे प्रदर्शनदेखील या शोचे आकर्षण राहणार आह. काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग के. पोळे म्हणाले की, या इव्हेंटसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ते म्हणाले, आदिवासी कल्याण विभाग ३० ते ४० तरुणांना शॉर्टलिस्ट करणार आहे. निवडलेल्या तरुणांना मोफत वैमानिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २५ सप्टेंबरला फुल ड्रेस रिहर्सल आयोजित करण्यात येत आहे.

७५ अनवट गावांना पर्यटनस्थळ बनवणार जम्मू-काश्मीर सरकार
मोहित कंधारी | जम्मू

मिशन यूथअंतर्गत जम्मू-काश्मिरातील ७५ अनवट गावांना आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. केंद्रशासित राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी नुकताच या योजनेचा शुभारंभ केला आहे.

या योजनेअंतर्गत ऐतिहासिक महत्त्व किंवा निसर्गरम्य असलेल्या, मात्र आजवर अपरिचित राहिलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे. योजनेनुसार या गावांत गाणी व चित्रपटांच्या शूटिंगसाठी ८ ते १० लाख रुपयांची विशेष मदत केली जाईल. सोबतच स्थानिक कलाकार व पारंपरिक कलांना चालना देण्यासाठी २-२ लाख रुपयांचे साहाय्य केले जाईल. तसेच ट्रेकिंग आणि पॅरा ग्लायडिंगसारख्या साहसी पर्यटनालाही चालना देण्यात येईल. यासाठी यूथ ग्रुप्स व सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या माध्यमातून तरुणांना जोडले जाईल. लॉकडाऊन उघडण्यासोबतच जम्मू-काश्मिरात पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. जुलैत राज्यात एकूण १०.५ लाख पर्यटक आले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या ११.२ लाखांवर गेली.

विकसित होत असलेल्या गावांत उधमपूर जवळील मनवाल गावाचाही समावेश आहे. हे गाव प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. काला डेरा मंदिर (छायाचित्रातील) आणि देवी भगवती मंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याची संरक्षित स्मारके आहेत.

अशांतता व सरकारांच्या दुर्लक्षामुळे असे शो कधीच झाले नाही
या शोमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हांसोबत वेस्टर्न एअर कमांडचे एओसी-इन-सी एअर मार्शल बी.आर. कृष्णांसह ४००० पेक्षा जास्त लोक भाग घेतील. तसेच श्रीनगर आणि परिसरातील ३००० शाळकरी मुलेही या एअर शोमध्ये येतील. याआधी २००८ मध्ये भारतीय हवाई दलाने एक शो आयोजित केला होता. मात्र यानंतर २०१० ते २०१६ पर्यंत खोऱ्यात अशांततेच्या स्थितीमुळे असा एकही शो आयोजित झाला नाही. दुसरीकडे, राज्य सरकारांनीही राज्यातील तरुणाईला विमानन क्षेत्रासोबत जोडण्यासाठी असा कुठलाही प्रयत्न केला नाही.

बातम्या आणखी आहेत...