आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The MLA Arranged The Marriage At Home And Also Donated The Bride Himself; News And Live Updates

कोरोना महामारी:आमदाराने घरीच लावले लग्न, कन्यादानही स्वत:च केले; मी ही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने दु:ख समजू शकताे

दौसा (राजस्थान)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या घरातच कन्यादान करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे महवाचे आमदार ओमप्रकाश हुडला.

छायाचित्र दौसा (मंडावर) येथील अाहे. मास्क अाणि ग्लाेव्हज घालून अापल्या घरातच कन्यादान करणाऱ्या व्यक्तीचे नाव अाहे महवाचे अामदार ओमप्रकाश हुडला. याच मुलीला त्यांनी तीन दिवसांपूर्वी दत्तक घेतले हाेते. रसीदपूरचे राम खिलाडी महावर हे एक गरीब शेतकरी अाहेत. त्यांच्या मुलीचे लग्न २६ मे राेजी हाेते, पण लग्नासाठी ते व्यवस्था करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी तीन दिवसांपूर्वी अामदारांकडे विनंती केली. त्यानंतर अामदारांनी त्यांच्या मुलीला दत्तक घेतले.

आमदारांनी वडील अाणि भावाचे कर्तव्य निभावताना अापली पत्नी प्रेमप्रकाश अाणि अाई मिश्रीदेवी यांच्या मदतीने मुलगी चांदनी हिचे लग्न लावून दिले. कन्यादानात अामदारांनी वधूसाठी पलंग, गादी, उशी, कूलर, ड्रेसिंग टेबल, सेंटर टेबल, दागिन्यांमध्ये चांदीचे पैंजण, वधू-वरांसाठी अंगठी, नाकातील साेन्याची नथ, कानातील साेन्याची बाळी दिली. इतकेच नाही तर वऱ्हाडी पाहुण्यांना भाेजन दिले. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याचे दु:ख मी चांगले समजू शकताे, असे हुडला म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...