आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • The Mobile App Will Now Also Be Able To File Income Tax Returns, Tax Payments Online On The Portal; A New Website For ITR Will Be Launched Tomorrow

दिव्य मराठी विशेष:मोबाइल ॲपनेही आता प्राप्तिकर रिटर्न दाखल करता येतील, करभरणाही पोर्टलवर ऑनलाइन; आयटीआरसाठी उद्या लाँच होणार नवी वेबसाइट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कॉल सेंटर व चॅटबोट करतील रिटर्न भरण्यास मदत

प्राप्तिकर विभाग सोमवारपासून प्राप्तिकर परतावे (आयटीआर) भरण्यासाठी नवी वेबसाइट लाँच करत आहे. यानतंर स्मार्टफोन अॅपही लाँच केले जाईल. याशिवाय १८ जूनपासून वेबसाइटवर ऑनलाइन कर भरण्याची सुविधा मिळू शकेल. सध्या प्रचलित कर भरण्याची प्रक्रिया थोडी दीर्घ स्वरूपाची आहे. सध्याची आयटीआरई-फायलिंग वेबसाइट १ जूनपासून बंद होती. ७ जूनपासून ई-फायलिंग प्रक्रिया सुरू होईल.

नव्या पोर्टलचे नाव “ई-फायलिंग २.०’ असे आहे. लवकरच यावर करदात्यांच्या मदतीसाठी मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध होईल. यामुळे रिटर्न दाखल करण्यास मदत होईल. याशिवाय अनेक सुविधाही असतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, करासंबंधी कोणतेही प्रकरण १० जून २०२१ नंतरच हाताळले जाणार आहे. ७ ते १० जूनदरम्यान करदात्यांना ही नवी प्रणाली समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ असेल. या काळात एखादी सुनावणी नियोजित असेल तर त्यासंबंधीची सुनावणी १० जूननंतरच होऊ शकणार आहे.

कॉल सेंटर व चॅटबोट करतील रिटर्न भरण्यास मदत

 • तत्काळ इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस करण्याची सुविधा. यामुळे परतावा लवकर जमा होईल.
 • पोर्टलवर लॉग-इन केल्यानंतर करदात्यास डॅशबोर्ड दिसेल. येथे सर्व माहिती, अपलोड, प्रलंबित कामे दिसू शकणार आहेत.
 • प्राप्तिकर परतावे तयार करण्यासाठी एक सॉफ्टवेअर मिळेल. ते ऑनलाइन व ऑफलाइन उपलब्ध असेल. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कुणीही आयटीआर दाखल करू शकेल.
 • करदात्यांच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटर असेल. येथे एफएक्यू, ट्युटोरियल, व्हिडिओ, चॅटबोट/ लाइव्ह एजंट्समार्फत परतावे भरण्यास मदत घेता येईल.
 • डेस्कटॉपवर उपलब्ध सर्व टॅक्स ई-फायलिंग पोर्टल फंक्शन्स मोबाइल अॅपवरही उपलब्ध.
 • पोर्टलवर १८ जूनपासून नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस/ नेफ्टने कोणत्याही बँक खात्यातून ऑनलाइन कर भरता येईल.
बातम्या आणखी आहेत...