आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Modi Government Is Destroying The Democratic Institutions Of The Country; Strong Criticism Of Saenia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारवर हल्लाबोल:देशातील लाेकशाही संस्थांना मोदी सरकार उद्ध्वस्त करतेय; साेनिया यांची जोरदार टीका

रायपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात काँग्रेस अंतरिम अध्यक्षांचा सहभाग
  • देशात गरीबविराेधी शक्ती हिंसाचाराचे विष फैलावत असल्याचाही आरोप

माेदी सरकार लाेकशाही संस्थांना उद्ध्वस्त करत आहे, देशात गरीबविराेधी शक्ती हिंसाचार व तिरस्काराचे विष पसरवण्याचे काम करत आहे, असा आराेप काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा साेनिया गांधी यांनी केला.

साेनिया पुढे म्हणाल्या, देशात लाेकशाहीवर हुकूमशाही वरचढ ठरू लागली आहे. देशाच्या उदयात याेगदान देणाऱ्या नेत्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर संविधान व लाेकशाही अशी संकटात येईल असा कधी विचारही केला नसावा. कारण, वाईट प्रवृत्ती आता वाढत चालली आहे. सध्याच्या परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संकट आहे. लाेकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दरम्यान, छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास व्हिडिआे काॅन्फरन्सिंगद्वारे शनिवारी साेनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले.

संविधानाचे संरक्षण करा :

देशात तिरस्कार पसरवला जात आहे, परंतु आपले संविधान अशा भावनांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे. अशा भावना येणार नाहीत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वातंत्र्य लढाईत आपण काही प्रण केले हाेते. त्याची पूर्तता करण्यासाठी अद्यापही खूप काही करणे बाकी आहे. गेल्या काही दिवसांपासून लाेकशाहीसमाेर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत. काेणाचाही नामाेल्लेख टाळत साेनिया म्हणाल्या, देशातील लाेकांचा आवाज बंद केला जात आहे. तरुण, आदिवासी, महिला, शेतकरी, दुकानदार व लहान व्यापारी, जवान यांनी मूग गिळून राहावे असे त्यांना वाटते. मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्यामुळे देशात भेदभाव देखील वाढू लागला आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली. लोकशाही संस्था टिकल्या तरच स्वातंत्र्याला अर्थ आहे. परंतु मोदी सरकारने अशा संस्थाना नष्ट करण्याचे काम करण्यास सुरूवात केली आहे.

बघेल सरकारचे काैतुक

साेनिया गांधी म्हणाल्या, १५ वर्षांच्या प्रदीर्घ अवधीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. गेल्या काही वर्षांत छत्तीसगडमध्ये जे काही घडले त्यावरून एक दिशाहीन व विचारहीन सरकार जनहिताचा विचार करू शकत नाही हे स्पष्ट झाले. मात्र, आमचे सरकार याेग्य दिशेने काम करत असल्याचा मला आनंद वाटताे.