आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Modi Government's Decision To Reduce Fuel Prices Was Taken Out Of Fear Priyanka Gandhi

काँग्रेसचा हल्लाबोल:मोदी सरकारच्या इंधन दरकपातीचा निर्णय हा 'भीतीपोटी' घेण्यात आला, येणाऱ्या निवडणुकीत या लुटणाऱ्या सरकारला उत्तर देऊ - प्रियंका गांधी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. या वर्षात मोठ्या प्रमाणात इंधनमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपयांनी तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यावर आता काँग्रेसकडून मोदींवर टीका होतांना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्राच्या या निर्णयाची खिल्ली उडवत, भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला असे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "हा तर भीतीपोटी घेतण्यात आलेला निर्णय आहे. मनापासून नाही. वसूली सरकारला आपण येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर नक्कीच देऊ" असे ट्विट करत प्रियंकाने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

इंधनमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते, त्यावर आता दिवाळी तोंडावर मोदी सरकारने दिलासा देण्याच्या नावावर पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलमध्ये दहा रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल हे 115 रुपयांच्या पार गेले होते. तर दिल्लीत देखील पेट्रोलसाठी 110 रुपये मोजावे लागत होते.

आणखी किंमती वाढणार

आंतरराष्ट्रीय बाजार कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. सध्या प्रति बॅलेरसाठी 85 डॉलर रुपये मोजावे लागत असून, किंमती वाढल्यानंतर 100 डॉलर एका बॅलेरसाठी द्यावे लागणार आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर सुमार 10-15 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2022 च्या पहिल्या तिमाहीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...