आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारणत: आतापर्यंत काश्मीरला पोहोचणारा मान्सून १२ दिवसांपासून यूपी-बिहारच्या सीमेवर अडकला आहे. तो १७ जूनला मऊ जिल्ह्याजवळ पोहोचला होता, पण पाकिस्तानातून राजस्थानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढे सरकताना दिसत नाही. असे याआधी कर्नाटकातही झाले आहे. तिथे मान्सून १० दिवस अडकला होता.
हवामान तज्ज्ञांनुसार, बंगालच्या खाडीत हवेचा दाब थोडा कमी आहे. त्यामुळे मान्सूनला पुढे ढकलणारे वारे थांबले आहेत. मात्र, आता पश्चिमी वारे कमकुवत व्हायला लागले आणि बंगालच्या खाडीमार्गे वारे उत्तर-पश्चिमेकडे वाहत आहेत.पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर प्रदेशच्या वेशीवर....
त्यामुळे पुढचे दोन दिवस मानसून पुढे सरकायला लागेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास ८-१० दिवसांच्या आत मान्सून काश्मिरला पोहोचू शकतो. त्यानंतर तो राजस्थान पार करत संपूर्ण देशाला कव्हर करू शकतो. दक्षिण आणि इशान्येकडील राज्ये वगळता मानसून आतापर्यंत कमकुवत राहिला. देशात १ ते २७ जूनदरम्यान सरासरी १५० मिमी पावसाची नोंद होते. यंदा १३५ मिमी झाली आहे. म्हणजेच १०% कमी
आसामात जलसंकट; या राज्यामध्ये सरासरीपेक्षा ८०% जास्त झाला पाऊस
गुवाहाटी | आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. ३ लाखांवर लोक मदत छावण्यांत व रस्त्याच्या कडेला राहत आहेत. राज्याच्या ३२ जिल्ह्यांतील ५,४२४ गावांना पुराचा वेढा आहे. इथे सरासरीपेक्षा ८०% जास्त पाऊस झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.