आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The More Times You Are Rejected, The Harder You Work, The More You Reap The Rewards: Manoj Vajpayee; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:जेवढ्या वेळा नाकारले जाल, तेवढेच जास्त तुम्ही कष्ट घेता, तेव्हाच फळाची प्राप्तीही होते : मनोज वाजपेयी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलीवूड कलाकार मनोज वाजपेयी म्हणतात, आयुष्यभर संघर्ष असतात, हार स्वीकारायची नाही

अनेक जण आहेत, ज्यांना मनासारखे काम करता येत नाही. मूठभर लोक आहेत, ज्यांना मनासारखे काम करण्याचे आशीर्वाद मिळाले आहेत. संघर्ष आयुष्यभर सुरू असतो. पण पराभव मान्य करायला नको, असे म्हणणे आहे प्रख्यात बॉलीवूड आणि रंगभूमीवरील कलाकार मनोज वाजपेयी यांचे. त्यांची सिरियल ‘फॅमिली मॅन’चा नुकताच दुसरा भाग आला आहे. यानिमित्त त्यांनी नकार, आव्हाने, अाध्यात्मिकता, चित्रपट उद्योगात उपरा असल्याने आलेल्या अडचणी व टिकून राहण्यासाठीचे कष्ट याबाबत मीडिया प्लॅटफॉर्म इनक्वायरीशी विशेष चर्चा केली. वाचा मुख्य अंश...

खाण्यासाठी-कपड्यांसाठीही पैसे नव्हते, आयुष्यात कष्ट आवश्यक आहेत, तेव्हाच माणूस ओळखला जातो

नाकारले जाण्याशी युद्ध
२०-२१ वर्षांचा असताना गावात सर्व काही सोडून आलो होतो. अनेक प्रयत्न करूनही नकार मिळायचा. खूप वाईट वाटायचे. विशेषत: माझ्यासारखी व्यक्ती, जिच्याकडे कोणताही ‘प्लॅन बी’ नसलेली. डीयूत असताना तिन्ही वर्षे अखेरच्या महिन्यातच अभ्यास केला. नाटक व अभिनयावरच पूर्ण लक्ष होते. एनएसडीत प्रवेशासाठी खूप प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. नकार मिळाल्यावर काय करायचे, कोठे जायचे काहीच समजत नाही. मात्र जेवढ्या वेळा नकार मिळतो तेवढेच तुम्ही स्वत:वर काम करता. ही प्रक्रिया थांबत नाही आणि ती थांबायलाही नको.

जिद्द कायम ठेवणे
एवढे घडूनही मी मार्ग बदलला नाही आणि नाटकात जास्त काम करू लागलो. अनेकदा घरून मंडी हाऊसपर्यंत जायला पैसे नसायचे. ७-८ किमीच्या प्रवासात भूमिकेचा विचार करायचो, संवाद पाठ करायचो, एखाद्या वेळी मुलासारखे स्वत:सोबत इंग्रजीत बोलायचो. जेवणासाठी पैसे नव्हते, कपड्यांसाठी मित्रांवर अवलंबून होतो. मात्र ठाम राहिलो. आयुष्यात संघर्ष गरजेचा आहे. जेव्हा स्वत:साठी कष्ट घेता तेव्हा फळ मिळतेच, आपली ओळख होते.

उद्योगात स्थान
मी उपरा होतो, खूप टीका व्हायची. टीकांनाच अापले बळ केले. स्वत:वर खूप काम केले. त्याशिवाय चांगले परिणाम कसे देणार? ज्यात टीका होती ती सर्व विश्लेषणे सांभाळून ठेवली आहेत. लोकांनी माझा रंग, दिसणे यावर टोमणे मारले. यामुळेच मला जास्त संघर्ष करायची प्रेरणा मिळाली.

नायक होण्याची जाणीव
ही भावना आतून येते. तुम्हाला नवव्या किंवा विसाव्या मजल्यावरून उडी मारायची असेल तर दुखापत होऊ नये म्हणून तुमच्याकडे कौशल्य असायला हवे. मी चांगले करू शकतो याचा मला विश्वास होता. म्हणून कमीपणाची भावना येऊ दिली नाही. हीच तयारी तुम्हाला मजबूत करते.

अाध्यात्मिकता
आयुष्यात अाध्यात्मिकता आवश्यक आहे. मी ध्यान करतो, यौगिक नियमांचे पालन करतो. अाध्यात्मिकता तुमच्या पूर्ण भावविश्वावर परिणाम करते. याचा परिणाम तुमच्या कामावर होणे स्पष्टच आहे.

बातम्या आणखी आहेत...