आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Mother Had To Give Birth Due To The Onset Of Pain While On The Ventilator; Both Are Safe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरत:व्हेंटिलेटरवर असताना आईला वेदना सुरू झाल्याने करावी लागली प्रसूती; दोघे सुखरूप

सुरत20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाने देशातील अनेक राज्यांना व्यापले आहे. अनेक राज्यांत नवे रुग्ण वाढत आहेत. संसर्गाचे हे प्रमाण वाढत असताना या दुष्टचक्रातून गुजरातही सुटलेला नाही. या भयंकर परिस्थितीत हे नवे जीवन फुलले. आई व्हेंटिलेटरवर असताना पाचव्या दिवशी आईला प्रसववेदना सुरू झाल्याने तिची प्रसूती करावी लागली.

कोरोनाचा काळ म्हणून नवजात बालकाची तत्काळ कोरोना चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे बाळाचा हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता आई आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. लवकरच या बाळाला आईच्या कुशीत ऊब मिळेल.

बातम्या आणखी आहेत...