आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Mother Of A Newborn Girl, Who Was Born In The Sixth Month, Held Her For 18 Hours Every Day For Three Months

दिव्य मराठी विशेष:सहाव्या महिन्यात जन्मलेल्या नवजात मुलीस आईने तीन महिने रोज 18 तास छातीशी बिलगून ठेवले...अन् बाळाला मिळाले जीवदान

उदयपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानात डॉक्टरांनी अकाली जन्मलेल्या बाळास कांगारू मदर केअर उपचारांनी वाचवले

आई ती आईच... तिच्या त्यागाची तुलनाच होऊ शकत नाही. अशाच एका आईने नवजात मुलीला जीवदान मिळावे म्हणून तीन महिने रोज १८ तास छातीशी बिलगून ठेवत ऊब दिली. हा संघर्ष अखेर फळाला आला आणि नवजात मुलीच्या जिवाचा धोका टळला. आता हे बाळ ठणठणीत आहे. राजस्थानात उदयपूर जिल्ह्यातील सराडा येथील धापूबाई या महिलेची ही कहाणी...सहाव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली. मुलगी जन्मली तेव्हा वजन होते फक्त ७६० ग्रॅम. ती वाचण्याची शक्यताच नव्हती. तरी या मातेने आर्त भावनेतून डॉक्टरांची मनधरणी केली. आईची ही ममता पाहून डॉक्टरही भारावले. आता सुरू झाला डॉक्टरांचा संघर्ष. त्यांनी या बाळास ‘कांगारू मदर केअर’ (सीएमसी) उपचारांनी वाचवण्याचा निर्णय घेतला. यात आईने बाळास ९० दिवस रोज १८ तास छातीशी बिलगून ठेवावे लागणार होते. ती आईचीच माया...प्रेमळ स्पर्शाचा परिणाम बाळावर दिसू लागला आणि मुलीचे वजन वाढत वाढत दुप्पट झाले आणि आईच्या कष्टांना, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. आता मुलीची प्रकृती चांगलीच सुधारली आहे. उपचारात सहभागी असलेले डॉ. लाखन पोसवाल यांनी सांगितले, २६ आठवड्यांच्या (एक्स्ट्रीम प्री-मॅच्युअर) बाळास वाचवणे कठीण होते. यात आईच्या मायेच्या स्पर्शानेच मूल वाचू शकते.

काय आहे कांगारू मदर केअर: कांगारू पिल्लास शरीराशी चिकटून ठेवते. त्यामुळे त्याला ‘कांगारू मदर केअर’ तंत्र म्हणतात. यात बाळाच्या शरीराचे तापमानात समतोल राहतो. बाळाच्या शरीरातील दोष आपोआपच कमी होतात. युनिसेफनुसार, भारतात दरवर्षी ३५ लाख मुले प्री-मॅच्युअर जन्मतात. त्यापैकी १० लाख मुले वाचत नाहीत.

झोपेतही छातीशी बिलगलेल्या बाळाचा श्वास अनुभवला

आमच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती, पण मूल नव्हते. गेल्या वर्षी मी गर्भवती राहिले तेव्हा आनंद गगनात मावत नव्हता. पण सहाव्या महिन्यातच प्रसूती झाली. मी तीन महिने रुग्णालयात मुलीला रोज छातीशी बिलगून ठेवले. झोपेतही बाळ बिलगून असायचे. अनेक रात्री तर मी बसूनच घालवल्या. प्रत्येक क्षणाला बाळाच्या श्वासाची अनुभूती होत होती. आजही घरी बाळाला दूध पाजल्यानंतर एक तास छातीशी धरून ठेवत असते. (धापूबाईच्याच शब्दांत...)

बातम्या आणखी आहेत...