आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडमधील चमोली येथे आपत्तीमध्ये बेपत्ता लोकांची शोध मोहिम सलग 10 दहाव्या दिवसांपासून जारी आहे. परंतू, आता याकार्यात सहभागी टीमचे धैर्य खचत चालले असून NTPC बोगदा आणि आसपासच्या क्षेत्रामधून वेगवेगळे छिन्न विछिन्न शव आढळत आहे. उत्तराखंडचे डिजीपी अशोक कुमार यांनी सांगितले आहे की संबंधित प्रकरणाचे शोध मोहिम अभियान दिवस-रात्र चालू असून यात लोकांची जिवंत राहण्याची आशा खूप कमी आहे. यामूळे हे अभियान 3-4 दिवसांत सपुष्टात येणार असून साफ-सफाईचे काम सुरु असणार आहे.
आतापर्यंत आढळले 56 लोकांचे शव
आपत्ती क्षेत्रांमध्ये आतापर्यंत 56 लोकांचे शव आढळले असून यावितिरिक्त माणसांचे 22 छिन्न विछिन्न शव मिळाले आहेत. मृत शरीराची ओळख ही DNA चाचणीद्धारे केली जात आहे. DGP ने सांगितले आहे की जसे जसे शव आढळत आहे, तसे त्यांची ओळख पटविल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना सुर्पूत केले जात आहे. या आपत्तीमध्ये आतापर्यंत 148 लोक बेपत्ता आहेत.
SDRF ने रैणी गावात लावले अलार्म सिस्टीम
राज्य आपत्ती प्रतिसाद शक्तीने (SDRF) ने रैणी गावात अलार्म सिस्टीम लावले असून यामूळे ऋषिगंगा आणि धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढताच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देता येणार आहे. ज्यामुळे आजू-बाजू क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सोपे जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.