आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयागराज:महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे रहस्य कायम; सीडी, व्हिडिओ, अन् सुसाइड नोटचा तपास सुरू

प्रयागराज / विजय उपाध्याय2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम आहे. पोलिस या प्रकरणाशी संबंधित सीडी, सुसाइड नोट, व्हिडिओचा तपास करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने १८ सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पाच डॉक्टरांचे पॅनलही तयार करण्यात आले आहे. हे पॅनल बुधवारी महंतांच्या मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम करेल.

या कथित आत्महत्या प्रकरणात सुसाइड नोटच्या आधारे नरेंद्र गिरींचे शिष्य आनंद गिरीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात महंतांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आनंदवर लावण्यात आला आहे. आनंदला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले. मोठा हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांचीही पोलिस चौकशी करत आहेत. महंतांचा मृतदेह मंगळवारी बाघम्बरी मठातील रेस्ट हाऊसच्या कक्षात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांच्या मोबाइलचा फॉरेन्सिक तपास केला जात आहे. महंतांनी आत्महत्येआधी मोबाइलमध्ये व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्याची चर्चा आहे.

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे घाबरून आत्महत्या
नरेंद्र गिरी आपला बंडखोर शिष्य आनंदच्या धमकीमुळे घाबरले. त्यांच्या कथित सुसाइड नोटमधून ही बाब समोर आली. त्यानुसार, आनंदने एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह स्थितीतील महंतांचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. महंतांनी लिहिले आहे, ‘मी १३ सप्टेंबरला आत्महत्या करणार होतो. पण हिंमत झाली नाही. एक-दोन दिवसांत आनंद कॉम्प्युटरच्या माध्यमातून मोबाइलद्वारे एखादी मुलगी किंवा महिलेसोबत चुकीचे काम करत असल्याचे दाखवणारा फोटो व्हायरल करेल. कोणाकोणाला स्पष्टीकरण देणार? त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. त्याची जबाबदारी आनंद, आद्या प्रसाद व संदीप यांची असेल.’

अंत्यसंस्कार आज होणार
नरेंद्र गिरींच्या मृतदेहाचे पोस्टमाॅर्टेम झाल्यानंतर बाघम्बरी मठातच सनातन परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बातम्या आणखी आहेत...