आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोटार वाहन नियम:वाहनांच्या आरसीमध्ये नोंदवता येणार आता वारसाचे नाव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय वाहनांचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ बनवण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम-१९८९ मध्ये बदल करणार आहे. नव्या बदलात वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये (आरसी) मालकाला वारसाची (नाॅमिनी) नियुक्ती करण्याची सुविधा मंत्रालय देईल. मंत्रालयाने गुरुवारी त्याची मसुदा अधिसूचना जारी केली असून सर्व हितधारक आणि सामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.

मसुदा अधिसूचनेनुसार वाहनाच्या नोंदणीच्या वेळी वारसाचे नाव दाखल करण्याची सुविधा दिली जाईल. वारसाचे नाव नंतर ऑनलाइनही जोडले जाऊ शकेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser