आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाने गुरुवारी १६ व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. २९ जूनपर्यंत अर्ज भरणे, १८ जुलैला मतदान आणि २१ जुलै रोजी निकाल येतील. पूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही केली जाईल. १५ जून रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण मतांचे मूल्य १०,८०,१३१ आहे. ज्या उमेदवारास ५,४०,०६५ पेक्षा जास्त वेटेज मिळेल, तोच जिंकेल. रालोआजवळ ५,३२,१३९ चे वेटेज आहे. म्हणजे केवळ ७,९२६ हवे आहेत. १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुकीचाही परिणाम होईल.
राज्यसभेच्या २२७ व लोकसभेच्या ५४० खासदारांत ४४८ रालोआचे. प्रत्येक खासदाराचे मतमूल्य ७००. ४,०३३ आमदारांपैकी १,७३७ रालोआचे. यूपीच्या प्रत्येक आमदाराचे मतमूल्य २०८ आहे. आज राज्यसभेची १६ जागांची निवडणूकही प्रभाव पाडू शकते, कारण त्यांचे मतांचे मूल्य ११,२००
राजस्थान-हरियाणासह ४ राज्यांच्या १६ पैकी २ दिग्गजांच्या जागा अडकल्या
राज्यसभा निवडणुकीसाठी आज (१० जून) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. सायंकाळी ५ पासून मतमोजणी सुरू होणार असून लगेच निकाल जाहीर केला जाईल. राजस्थान, हरियाणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील १६ जागांसाठी ही निवडणूक हाेत आहे. यापूर्वी ५७ पैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाकडून झटका बसला आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली.
टाॅप-3 राष्ट्रपती, यांचा सर्वात मोठा विजय
वर्ष राष्ट्रपती बाजूने विरोधात
1957 राजेंद्र प्रसाद 99.3% 0.4%
1962 राधाकृष्णन 98.3% 1.1%
1997 नारायणन 94.97% 5.07%
टाॅप-3 राष्ट्रपती... यांचा सर्वात निसटता विजय
1969 व्ही.व्ही. गिरी 50.2% 48.5%
1967 झाकीर हुसेन 56.2% 43.4%
2017 रामनाथ कोविंद 65.65% 34.35%
काँग्रेसच्या २, भाजपची १ जागा पक्की.
महाराष्ट्र; ६ मध्ये भाजप २, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची १-१ जागा पक्की
हरियाणा; भाजपची एक जागा निश्चित आहे, अजय माकन अडकले.
कर्नाटक; भाजपच्या ३ आणि काँग्रेसची १ जागा पक्की. मात्र, ६ उमेदवार आहेत.
राष्ट्रपती होण्यासाठी खासदार आणि आमदारांच्या मतांचे एकूण मूल्याच्या ५०% असणे आवश्यक. २०१७ च्या निवडणुकीत रालोआ उमेदवार कोविंद यांनी १०,६९,३५८ पैकी ७,०२,०४४ मते प्राप्त केली. नीलम संजीव रेड्डी 1977 मध्ये बिनविरोध निवडून आलेले एकमेव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.