आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Need For Global Standards On Social Media, Cryptocurrency: Prime Minister Narendra Modi

डेमोक्रसी समिट:सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सीवर जागतिक मापदंडांची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडिया व क्रिप्टोकरन्सीवर सामंजस्यपूर्ण जागतिक मापदंडाची गरज व्यक्त केली. अशा प्रणालीचा वापर लोकशाहीला बळकट करण्यासाठी व्हावा. यातून लोकशाही कमकुवत होता कामा नये. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन होते. स्वतंत्र व नि: पक्ष निवडणूक करण्याची प्रक्रिया इतरांना सांगण्यात आणि त्यासाठी मदत करण्यात भारताला नक्कीच आनंद वाटेल. बहुपक्षीय निवडणूक, स्वतंत्र न्यायपालिका व स्वतंत्र माध्यमे या गोष्टी मूलभूत असून त्या लोकशाहीच्या आधारस्तंभ ठरतात. लोकशाही म्हणजे केवळ लोक, लोकांसाठी आणि लोकांद्वारे नसून लोकांसोबत आणि लोकांमध्येही आहे.

लोकशाहीची मुख्य शक्ती आपले नागरिक व समाज मनातील भावना व मूल्यांमध्ये आहे. लोकशाही आमच्या मूल्यांचा अभिन्न असा भाग आहे. इंग्रज सरकारला देखील जनतेच्या या भावनांचे दमन करता येऊ शकले नव्हते. संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात बायडेन यांनी चीन व रशियावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, अशा हुकूमशहांमुळे लोकशाहीवर संकट आहे. कारण ते आपली शक्ती वाढवण्यावर भर देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...