आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात इंडियन मुजाहिदीनचे जुने नेटवर्क सक्रिय:दक्षिणेतील 5 राज्यांत फैलावले आयएस-अल कायदा संघटनांचे जाळे

अवधेश आकोदिया | जयपूर/बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक सरकारने युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारूचे हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे(एनआयए) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, प्रवीणची हत्या कट रचून केली आणि हा संघटित गुन्हा आहे. या प्रकरणाचा आंतरराज्यीय संबंध आहे. मात्र, एनआयएच्या तपासाची कक्षा या घटनेपुरती मर्यादीत राहणार नाही. एनआयए दक्षिण भारतात पसरलेले अतिरेक्यांचे जाळेही तपासणार आहे.

एनआयएशी संबंधित सूत्रांनुसार, आयबीकडून त्यांना कर्नाटक,केरळशिवाय तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगणातील अतिरेकी कारवायांशी संबंधित मोठे इनपूट मिळाले आहे. येथे इस्लामिक स्टेट(आयएस) आणि अलकायदाने पाय पसरले आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्ये या अतिरेकी संघटनांच्या अस्तित्वाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणातील सक्रियता प्रथमच समोर आली आहे.

असे पसरत आहेत पाय
कर्नाटक दहशतादी कारवायांचे मोठे केंद्र ठरले आहे. इंडियन मुजाहिदीनची स्थापना वर्ष 2000 मध्ये भटकळमध्येच झाली होती. त्यात कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळचे लोक सहभागी होते. सूत्रांमा दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात इंडियन मुजाहिदीनचे जुने नेटवर्क सक्रिय झाले आहे.

हत्येत पीएफआयचे धागेदोरे
आयबीच्या सूत्रांनुसार, केरळ आणि कर्नाटकात होत असलेल्या हत्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या वादग्रस्त संघटनेचे नाव येत आहे. तिचे वरिष्ठ केडर इस्लामिक स्टेट (आयएस) व अल-कायदाशी जोडलेले आहे. त्यापैकी बहुतांश आधी सिमीत सक्रिय होते.

टीएनटीएस, अल-उमा सक्रिय
तामिळनाडूत पीएफआयशिवाय तामिळनाडू तौहीद जमात (टीएनटीएस) व अल- उमा या नेटवर्कचा भाग आहेत. टीएनटीएस या संघटनेचा अध्यक्ष रागमथुल्ला हमतुल्लाह याने हिजाब प्रकरणात निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला धमकी दिली होती.

दीनार अंजुमनपासून धोका
‘दीनार अंजुमन’शी संबंधित संशयित लोक आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आयएस तसेच अल-कायदाचे काम करत आहेत. तिच्या स्थापनेवर 2001 मध्ये बंदी घालण्यात आली आहे, पण तिच्याशी संबंधित संशयित अजूनही सक्रिय आहेत आणि दहशतवादी कारवायांत सहभागी आहेत.

कर्नाटकात तिसरी हत्या
दरम्यान, दक्षिण कन्नड भागात दोन हत्यांनंतर गुरुवारी सायंकाळी सुरतकलमध्ये कारने आलेल्या तीन बुरखाधारी व्यक्तींनी कापड दुकान मालक मोहम्मद फाजिल (23) यांची हत्या केली. रात्री 8 वाजता झालेली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. मंगळुरू जिल्ह्यात आठ दिवसांत ही तिसरी हत्या आहे.

केरळात दोघांना अटक
प्रवीण हत्या प्रकरणात पोलिसांनी 15 जणांची चौकशी केली असून मोहंमद शफीक बेल्लारे आणि झाकीर सवानुरू यांना अटक केली आहे. दोघांनी मारेकऱ्यांना मदत केल्याचा आरोप आहे. मारेकरी फरार आहेत. हल्लेखोर केरळमधून आले होते,असा पोलिसांचा दावा आहे. दोघे हल्लेखोरांच्या संपर्कात होते.

बातम्या आणखी आहेत...