आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The New Corona Outbreak Adds To The Concern, With An Increase In Patients In 117 Countries, Worse Conditions In 29

कोरोनाची जगातील परिस्थिती:कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर, 117 देशांत रुग्णांत वाढ, 29 मध्ये वाईट स्थिती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत २४ तासांतील आकडा लाखावर

जगभरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट आहे. ११७ देशांत कोरोनामुळे आठवड्याची रुग्णसंख्या व मृत्यूमध्ये पुन्हा वाढ झाली. अमेरिका, फ्रान्स, रशिया, जपान, इराण व स्पेनसारख्या देशांचा समावेश आहे. त्यावरून जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव १३२ देशांत झाला आहे. त्यामुळे मलेशिया, थायलंड, इंडोनेशियासारख्या २९ देशांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांत खाटा कमी पडू लागल्या आहेत. रुग्णांना पार्किंग तसेच जमिनीवर उपचार करायची वेळ आली आहे. अनेक देशांत फ्रंटलाइन वर्कर्सकडे आवश्यक उपकरणे नाहीत. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ९०० तर रशियात ७५० पार झाला आहे.

संयुक्त राष्ट्र आरोग्य संस्थेचे संचालक टॅड्रॉस एडहेनॉम म्हणाले, गेल्या आठवड्या जगभरात कोरोनाचे ४० लाख नवे रुग्ण आढळले. हेच प्रमाण राहिले तर दोन आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या २० कोटींवर जाईल. ही संस्था तसेच त्यांचे सहकारी हा व्हेरिएंट वेगाने का पसरतोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंबंधी इशाराही जारी झाला आहे. कोविड-१९ सातत्याने आपले रुप बदलत आहे. महामारीच्या चार व्हेरिएंटमुळे सर्वांना चिंता वाटू लागली आहे.

अमेरिकेत २४ तासांतील आकडा लाखावर
अमेरिकेत एक दिवसातील बाधितांची संख्या एक लाखावर गेली आहे. फेब्रुवारीनंतरचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. आठवड्यातील रुग्णसंख्येचा वेग ३८ टक्क्यांनी वाढला. जपानमध्ये हाच वेग ८७ टक्के, इराण-२७ टक्के, फ्रान्स-२० टक्के, तुर्की-११४ टक्के, व्हिएतनाम-२७ टक्के, इटली-३२ टक्के, पाकिस्तान-८४ टक्के, जर्मनी-४० टक्के, इस्रायल-७३ टक्के, कॅनडा-५८ टक्के, फिनलंड-५९ टक्के, ऑस्ट्रेलिया-४० टक्के रुग्ण वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...