आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या देशातील विद्यमान स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मास्क सक्तीची गरज नसल्याच्या निष्कर्षाप्रत केंद्र सरकार आले आहे. तसेच यासाठी लसही खरेदी करण्यात येणार नाही. याशिवाय बूस्टर डोस घेण्याचीही गरज नसल्याचे पटवून देण्यात येणार आहे. आरोग्य गुप्तचर विभाग आणि आयएमसीआरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या वेगाने संसर्ग होत असलेला नवा विषाणू गंभीर नसल्याची माहिती आरोग्य गुप्तचर खात्याने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना दिली आहे.
८ दिवसांनंतर रुग्ण घटणार
एक हजार लोकांमध्ये फैलाव झाल्यानंतरही केवळ २५ व्यक्तींमध्येच त्याची लक्षणे आढळून येत आहेत. त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला प्रत्यक्ष डॉक्टरकडे जावे लागत आहे, असे दिसून अाले अाहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी मास्क सक्ती केल्यास विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. दररोज मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील ७ ते ८ दिवस रुग्ण वाढतील त्यानंतर नव्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ शकते असा मंत्रालयाचा अंदाज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.