आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी:मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्चला होणार; इतर राज्यांनाही पाठवल्या जाणार नोटीसा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 15- 16 – 17 या तारखेला सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी असणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. याविषयी 8 मार्च म्हणजेच आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकली आणि पुढील सुनावणी 15 मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यासोबतच न्यायालयाने म्हटले आहे की, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नाही. इतर राज्यांमध्ये देखील 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले आहे. त्या राज्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकरुन करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या प्रकरणात आता इतर राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

येत्या 15- 16 – 17 या तारखेला सुनावणी होणार आहे. 24 तारखेला 102 व्या घटनादुरुस्तीवर सर्व राज्यांना मत मांडण्याची सूचना देण्यात आली आहे. इतर राज्यांना मत मांडण्यासाठी नोटीसही देण्यात आली आहे. राज्यांना मत मांडायलाही सांगण्यात आले आहे. मात्र हे राज्य वेळ मागवून घेण्याची शक्यत आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्न लांबू शकतो.

बातम्या आणखी आहेत...