आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Active Cases Dropped From 87,000 In January To 1.65 Lakh In February

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:जानेवारीत 87 हजार ॲक्टिव्ह केस कमी झाल्या होत्या, फेब्रुवारीत कमी होण्याऐवजी वाढून 1.65 लाखांच्या पुढे गेल्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील वाढते कोरोना रुग्ण चिंता वाढवत आहे. मागील पाच दिवसांपासून दररोज 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. या सोबतच ॲक्टिव्ह केस म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्याही वाढत आहे. 31 डिसेंबरला 2 लाख 52 हजार 701 ॲक्टीव्ह रुग्ण होते, जे जानेवारीमध्ये कमी होऊन 1 लाख 65 हजार 685 झाले. म्हणजेच 87,016 रुग्ण कमी झाले होते परंतु 28 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा वाढून 1 लाख 65 हजार 715 झाला आहे.

24 तासात 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले
रविवारी देशात 15,614 लोक कोरोना संक्रमित आढळून आले. 11,291 लोक बरे झाले तर 108 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.11 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले असून 1.07 कोटींपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. 1.57 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.65 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...