आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Active Corona Patients In Maharashtra More Than Doubled In 10 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना कहर:मार्चमध्ये 10 दिवसांत दुपटीपेक्षा जास्त रुग्णवाढ, महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाखांवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच धूलिवंदनाचा सण हा सोमवारी आहे. यंदा काेरोनामुळे हा सण साजरा करू नये यासाठी मुंबईतील धारावी भागात आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून दुकानदार तसेच नागरिकांत पॉम्पलेट वाटून जनजागृती करत असल्याचे दिसत आहेत. - Divya Marathi
राज्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच धूलिवंदनाचा सण हा सोमवारी आहे. यंदा काेरोनामुळे हा सण साजरा करू नये यासाठी मुंबईतील धारावी भागात आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून दुकानदार तसेच नागरिकांत पॉम्पलेट वाटून जनजागृती करत असल्याचे दिसत आहेत.
  • देशाला लवकरच आणखी एक लस मिळणार, चाचण्या सुरू

कोरोनाचा एक पीक येऊन गेल्यानंतर भारतात पुन्हा संसर्ग वेगाने वाढतो आहे. गतवर्षी कोरोनाचे नवे रुग्ण ८ हजारांवरून ६२ हजार होण्यासाठी ६८ दिवस लागले हाेते. यंदा मात्र ४६ दिवसांतच हा पल्ला गाठला. मार्चमध्ये कोरोनाचे रग्ण सर्वात वेगाने वाढले. १६ मार्चला देशात २४,४९२ रुग्ण होते. २४ मार्चपर्यंत ते ४७,२६२ आणि २६ मार्चला ५९,११८ झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत ५८,०११ नवे रुग्ण आढळले.

देशात महाराष्ट्र आणि पंजाबमुळे काेराेना रुग्ण वाढताहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ३६,९०२ रुग्ण आढळले. गुजरातेत सर्वाधिक २,२७६ रुग्ण आढळले. येथील आयआयटीत ४० तर आयआयएममध्ये २५ रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांवर
महाराष्ट्रात शनिवारी ३५,७२६ नवे रुग्ण, १६६ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात १४,५३४ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ३४७५ झाली आहे.

विदर्भ : ७९ कोरोना मृत्यू
विदर्भात शनिवारी ७९ मृत्यू, तर ७२३७ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ६४ जणांमध्ये नागपूरच्या ५४ जणांचा समावेश आहे. दुसरीकडे पश्चिम विदर्भातही कोरोनामुळे १५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाडा : ४६६९ रुग्ण
मराठवाड्यात ४६६९ रुग्ण, तर ६७ जणांचा मृत्यू झाला. आैरंगाबादेत १७१५ रुग्ण, २८ मृत्यू झाले. नांदेड जिल्ह्यात १६ मृत्यू तर १०७३ रुग्ण आढळले. जालना ४४० रुग्ण, ८ मृत्यू, बीड ३७५, लातूर ४८ रुग्ण परभणीत २४६ रुग्ण, ८ मृत्यू झाले.

आता ४६ जिल्ह्यांवर नजर
एक कोरोना रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना संक्रमित करू शकतो

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सर्वाधिक कोरोनाग्रस्त १२ राज्ये व त्यांच्या ४६ जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, १ रुग्ण एका महिन्यात सरासरी ४०६ लोकांना संक्रमित करू शकतो. ४६ जिल्ह्यांत सर्वात जास्त रुग्ण व मृत्यू होत आहेत. यापैकी ३६ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातीलच आहेत. संसर्गाची साखळी खंडित होण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी किमान १४ दिवस कठोर पावले उचलावी.

देशाला लवकरच आणखी एक लस मिळणार, चाचण्या सुरू
सीरमचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले, कोवोव्हॅक्स लसीची भारतात चाचणी सुरू झाली आहे. ती सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकते. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेची कंपनी नोवाव्हॅक्स व सीरमने करार केला होता. ही लस द. आफ्रिकन व यूके व्हेरियंटवर चालते. ती ८९% प्रभावी आहे.

बातम्या आणखी आहेत...