आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:देशात काेराेनाग्रस्तांचा आकडा 30 लाखांवर, 16 दिवसांत 10 लाख रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्ण 0.8 टक्के वाढले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात प्रथमच एका दिवसात 10 लाखांवर कोरोना चाचण्या

देशात शनिवारी काेराेनाग्रस्तांचा आकडा ३० लाखांच्या वर गेली. शनिवारी ७१,१२६ नव्या रुग्णांसह एकूण बाधितांचा आकडा ३० लाख ३७,६५७ वर गेला. ३० लाखांपेक्षा जास्त रुग्ण असलेला भारत जगातील तिसरा देश बनला आहे. भारताआधी अमेरिकेत ६ जुलैला आणि ब्राझीलमध्ये ८ ऑगस्टला रुग्णसंख्या ३० लाखांच्या पार पोहोचली होती. भारतात तर गेल्या १६ दिवसांत तब्बल १० लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशातील १० लाख रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतच्या सर्वात जास्त वेगाने वाढला आहे.

देशात प्रथमच एका दिवसात १० लाखांवर कोरोना चाचण्या
- देशात शुक्रवारी १० लाख २३,८३६ लोकांच्या काेराेना चाचण्या झाल्या. चाचण्यांनी प्रथमच १० लाखांचा टप्पा ओलांडला. पैकी ३.८० लाख रॅपिड अँटिजन टेस्ट आहेत. आॅगस्टच्या २० दिवसांत चाचणी क्षमता दुप्पट झाली आहे.

- भारतात एकूण ३ कोटी ४४ लाख ९१,०७३ चाचण्या झाल्या. भारत आता रशियाला मागे टाकून सर्वाधिक चाचण्या घेणारा तिसरा देश ठरला आहे. चीनमध्ये ९.०४ कोटी आणि अमेरिकेत ७.४७ कोटी लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत.

- सुमारे २ महिन्यांपर्यंत तामिळनाडूत सर्वाधिक चाचण्या होत होत्या. आठवडाभरापासून यूपीने आघाडी घेतली आहे. दोन्ही राज्यांत ४० लाखांपेक्षा जास्त चाचण्यात झाल्या आहेत.

- यूपीत बहुतांश रॅपिड अँटिजन चाचण्या झाल्या. महाराष्ट्र, तामिळनाडूत विश्वासार्ह आरटी-पीसीआर टेस्ट होत आहेत.