आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आता कोरोना विषाणू लहान राज्यांकडे वळल्याचे चित्र आहे. नव्या रुग्णांमधील देशात हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त ९.३ टक्के आहे. सिक्कीम (६.५ टक्के), उत्तराखंड (६.४ टक्के), मणिपूर (५.७ टक्के), नागालँड (३.९ टक्के), मिझोरम (३.७ टक्के) सारख्या लहान राज्यांत नव्या रुग्णांचे प्रमाण जास्त झाले आहे.परंतु राष्ट्रीय पातळीवर नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सोमवारी देशात १९ हजार १४७ नवे रुग्ण आढळले होते. परंतु ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेनमुळे विषाणूचा प्रसार वाढण्याची चिंता आहे.
हिमाचलमध्ये जास्त
दुसरीकडे देशातील ३३ राज्य व केंद्रशासित राज्यांत बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त आहे. म्हणजेच राज्यांत ९० टक्क्यांहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. केवळ हिमाचल (८९ टक्के) तर सिक्कीम (८९.६ टक्के) आहे. आता बरे होण्याचा दर ९० टक्क्यांहून कमी आहे.
राज्य सक्रिय रुग्ण
हिमाचल 9.3%
केरळ 8.5%
सिक्कीम 6.5%
उत्तराखंड 6.4%
छत्तीसगड 6.0%
मणिपूर 5.7%
नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या दुपटीवर
ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनमुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सोमवारी ब्रिटनमध्ये २९,१२१ रुग्ण आढळून आले होते. १ डिसेंबरला नवे रुग्णसंख्या १४,८९९ एवढी होती. ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे व्यवस्थेवर ताण पडला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.