आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona India Daily News And Updates, 28 July 2020; The Number Of Corona Patients In The Country Is More Than 1.5 Million

कोरोना देश:देशातील कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांच्या पुढे, यातील 9.87 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एकूण संक्रमितांची संख्या 15 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात मंगळवारी 45 हजार 400 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, तर 32 हजार 657 पेक्षा जास्त रुग्ण ठीक झाले आहेत. सध्या देशभरात 15 लाख 29 हजार 653 रुग्ण आहेत, तर यातील 9 लाख 87 हजार 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 755 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण मृतांचा आकडा 34,223 झालाय.

दरम्यान, ओडिशा सरकारने जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना म्हटले की, कोरोना टेस्टिंगच्या प्रतिक्षेत संशयित संक्रमितांचे मृतदेहांचे अंतिम संस्कार थांबवले जाणार नाही. दोन दिवसांपूर्वी गंजम जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह अहवालाच्या प्रतीक्षेत तसाच होता. कोणीही स्पर्श केला नव्हता. ते पाहता हा आदेश देण्यात आला आहे. संशयितांच्या देहाचे लवकरात लवकर कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्कार केले जावेत, असे सरकारने म्हटले आहे.

तिकडे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही संक्रमितांचा आंकडा 1-1 लाखांच्या पार गेला आहे. येथे प्रत्येक दिवशी 5-6 हजार नवीन केस वाढत आहेत. आंध्र प्रदेशात सोमवारी 6.051 नवीन रुग्ण वाढले. आतापर्यंत येथे 1,02,349 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कर्नाटकात गेल्या 24 तासांमध्ये 5,324 नवीन प्रकरणं समोर आले आहेत. येथे आतापर्यंत 1,01,465 लोक संक्रमित असल्याचे समोर आले आहे.