आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाविरूद्धच्या लढाईत मोठे यश:देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटी पार, शेवटचे 10 कोटी डोस फक्त 20 दिवसात दिले गेले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात कोरोना लसीकरणाची संख्या 50 कोटी पार झाली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारताने कोरोनाविरुद्धच्या लढाईत ऐतिहासिक यश मिळवले आहे. सर्वांचे अभिनंदन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.

आरोग्य मंत्री म्हणाले की, लसीकरणात देशाला 10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 85 दिवस लागले. यानंतर 20 कोटींचा आकडा पार करण्यासाठी 45 दिवस, 30 कोटींवर पोहोचण्यासाठी 29 दिवस, 40 कोटींवर पोहोचण्यासाठी 24 दिवस आणि 50 कोटींचा आकडा पार करण्यासाठी आणखी 20 दिवस लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या मैलाच्या टप्प्यानंतर आपण लसीकरणाची गती सुरू ठेवू आणि सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करू.

शुक्रवारी 43.29 लाखांहून जास्त लसीकरण
सरकारनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 7 पर्यंत 50.03 कोटी डोस दिले गेले आहेत. शुक्रवारीच 43.29 लाखांहून अधिक लस देण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 18-44 वयोगटातील 17.23 कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 1.12 कोटींना दुसरा डोस मिळाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये या वयाच्या लोकांना एक कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

देशात या वर्षी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. 21 जूनपासून त्याची कमान पूर्णपणे केंद्राने आपल्या हाती घेतली. तेव्हापासून केंद्र सरकार लस निर्मात्यांकडून 75% लस खरेदी करत असून ती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देत आहे. 25% पुरवठा खाजगी रुग्णालयासाठी ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...