आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Corona Victims Decreased By 31%, But The Number Of Dead Decreased By Only 6%!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरात कोरोना:बाधितांची संख्या 31% कमी, पण मृत केवळ 6% घटले! जगभरात 11 जानेवारीला बाधितांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाचा सर्वाधिक फटका बसलेले केरळ दुसऱ्या क्रमांकाचे राज्य

जगात काेराेना महामारीचा वेग नव्या वर्षात मंदावू लागला आहे. परंतु मृतांची संख्या त्या तुलनेत कमी हाेताना दिसत नाहीत. जगभरातील आकड्यानुसार ११ जानेवारी २०२१ राेजी काेराेना बाधितांची संख्या सर्वाधिक हाेती. या दिवशी ७,३६,३९६ नवे रुग्ण आढळून आले हाेते. त्यानंतर नवे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. ३ फेब्रुवारीला ५०३१०७ नवे रुग्ण आढळले. म्हणजेच दरराेज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत ३१.७ टक्के घट झाली आहे. परंतु मृत्यू २६ जानेवारीला सर्वाधिक हाेते. तेव्हा १४ हजार ३२२ मृत्यू झाले हाेते. दरराेजच्या मृतांची सरासरी ३ फेब्रुवारीला घटली. या दिवशी १३,४०१ मृत नाेंदवण्यात आले. त्यावरून दरराेजच्या सर्वाधिक मृतांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ६.४ टक्क्यांनी कमी झाले. दरराेज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सुमारे ५ टक्के कमी आहे. दरराेजच्या सरासरी नव्या रुग्णसंख्येत घट हाेण्यामागील कारण अमेरिका व ब्रिटनमध्ये आढळून येणारी रुग्णसंख्या आहे. तेव्हा अमेरिकेत दरराेज सुमारे २.४० लाख नवे रुग्ण आढळून येत हाेते. आता त्यात घट हाेऊन ते १.३० लाखावर आहेत.

काेराेनाचा सर्वाधिक फटका बसलेले केरळ दुसऱ्या क्रमांकाचे राज्य
देशात काेराेनामुळे फटका बसलेल्या राज्यांत केरळ दुसऱ्या क्रमांकावर पाेहाेचले आहे. आधी कर्नाटक या स्थानी हाेते. काेराेनाचे नवे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. त्यापैकी निम्मे केरळचे आहेत. देशात सर्वाधिक काेराेना रुग्ण महाराष्ट्रात २०.३३ लाख आहेत. केरळमध्ये एकूण ९.४४ लाख रुग्ण आहेत. कर्नाटकात सध्या सुमारे ९.४० लाख रुग्ण आहेत. ३ फेब्रुवारीला केरळमध्ये ६३५६ नवे रुग्ण आढळले हाेते. देशात एकूण नवे बाधित १२,९१६ आढळून आले हाेते. देशात दरराेजचे सरासरी नवे रुग्णांपैकी निम्मे रुग्ण केरळमधील आहेत. देशातील एकूण नव्या बाधितांपैकी ७० टक्के रुग्ण केवळ दाेन राज्यांत (केरळ व महाराष्ट्र) आढळून येत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात केरळने या महामारीला नियंत्रित करून आघाडी घेतली हाेती. परंतु आता केरळ पिछाडीवर पडला आहे.

एप्रिलपासून मृतांच्या प्रमाणात घट
जगभरात रुग्ण व मृतांमधील सरासरी एप्रिल २०२० मध्ये सर्वाधिक (७.२ टक्के ) हाेता. तेव्हापासून हे प्रमाण सतत घटत हाेते. २५ जानेवारी २०२१ राेजी या प्रमाणात २.१ टक्के घसरण झाली आहे. परंतु २६ जानेवारीपासून मात्र त्यात पुन्हा २.२ टक्के वाढ झाली आहे. तपासणी कमी झाल्यामुळे हा आकडा वाढल्याचे दिसून येते.