आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Corona Victims Is Over 9 Crore; The Fastest Phase Of 15 Days, The Situation Is Out Of Control In The US, Europe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:कोरोनाबाधितांची संख्या 9 कोटींवर; 15 दिवसांचा सर्वात वेगवान टप्पा, अमेरिका, युरोपात वेग वाढल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २२ जानेवारीला बाधितांचा आकडा १० कोटींवर पोहोचला; चिंतेत भर

अमेरिका, युरोपसह अनेक देशांत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतरही संसर्गाचा वेग रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. जगभरात बाधितांची एकूण संख्या ८ कोटींहून ९ कोटींवर पोहोचली. हा टप्पा केवळ १५ दिवसांत गाठला आहे. महामारी सुरू झाल्यापासूनचा हा सर्वाधिक वेगवान एक कोटी बाधितांचा हा टप्पा मानला जात आहे. २५ डिसेंबरला बाधितांची संख्या एक कोटीहून जास्त होती. ९ कोटींचा आकडा ९ जानेवारीला पार झाला. अमेरिका व युरोपमध्ये संसर्ग वाढीचा वेग प्रचंड राहिला. अमेरिकेत गेल्या पंधरा दिवसांत ३३.७७ लाखांहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. युरोपातील सर्व देशांना मिळून १५ दिवसांत ३६.०४ लाखांहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. म्हणजेच शेवटच्या एक कोटी संसर्गात सुमारे ७० लाख बाधित अमेरिका व युरोपातील आहेत. भारतातील स्थिती तुलनेने चांगली आहे. भारतात १५ दिवसांत केवळ २.८१ लाख बाधित आढळून आले.

चीनच्या कुरापती : वुहान प्रयोगशाळेत ३०० पेक्षा जास्त स्टडी डिलीट
चीनवर कोरोना महामारीचा संसर्ग वाढवण्याचे आरोप लावण्यात येतात. आता त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. वुहान येथील व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेशी संबंधित ऑनलाइन डेटा डिलीट करण्यात आल्याचा हा आरोप आहे. ब्रिटनच्या ‘द मेल’च्या म्हणण्यानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑ‌फ व्हायरॉलॉजीमध्ये होत असलेल्या संशोधनाशी संबंधित शेकडो पानांचा डेटा नष्ट करण्यात आला आहे. नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशन ऑफ चायनाने ३०० हून जास्त प्रबंध प्रकाशित केले होते. त्यात जनावरांतून मानवाला होणाऱ्या संसर्गाबद्दलचे तपशील होते. ते तथ्य आता नष्ट करण्यात आले आहे. नष्ट केलेल्या सामग्रीत वुहानच्या व्हायरॉलॉजिस्ट शी झेंगली यांच्या कामाचाही समावेश आहे. त्यांनी वटवाघळांचे नमुने घेण्यासाठी गुहांनादेखील भेटी दिल्या होत्या. याबरोबरच सार्ससारख्या संसर्गजन्य रोगांबद्दल जोखीम मांडणारे संशोधनही नष्ट झाले आहे.

२२ जानेवारीला बाधितांचा आकडा १० कोटींवर पोहोचला; चिंतेत भर
९ जानेवारीला जगात बाधितांचे एकूण ७.७३ लाख नवे बाधित आढळून आले होते. हाच वेग कायम राहिल्यास ९ कोटींहून १० कोटींचा टप्पा १३ दिवसांत पूर्ण होईल. २२ जानेवारीला ही संख्या १० कोटींहून जास्त होऊ शकते. अमेरिका व युरोपात डिसेंबर अखेरच्या टप्प्यात व जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात सणोत्सवांचा काळ होता. तेव्हा नियम कडक करण्यात आले होते, तरीही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्याचा परिणाम आता पाहायला मिळू लागला आहे. नव्या स्ट्रेनमुळे बाधितांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...