आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Number Of Coronadomers Is Over 8,000; High Numbers For The First Time In 103 Days | Marathi News

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग:एकाच दिवसात बाधितांची संख्या 8 हजारांवर; 103 दिवसांनंतर प्रथमच ऐवढी संख्या

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशाची तपासणी करताना पालिकेचे पथक. - Divya Marathi
मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशाची तपासणी करताना पालिकेचे पथक.

देशात कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. चोवीस तासांत ८ हजार ३२९ नवे रुग्ण आढळून आले. १०३ दिवसांनंतर पहिल्यांदाच ८ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासांत १० जणांचा मृत्यू झाला. जानेवारीत देशात आलेल्या तिसऱ्या लाटेनंतर संसर्गाचे प्रमाण एवढ्या वेगाने वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरात समोर येत असलेल्या प्रकरणांपैकी ७० टक्के महाराष्ट्र व केरळमधील आहेत. केरळमधील संख्याही धडक वाढवणारी आहे. केरळात रोज २ हजार पॉझिटिव्ह आढळतात.

महाराष्ट्रात शुक्रवारी चार महिन्यांनंतर आढळलेली रुग्णसंख्या तीन हजारांहून जास्त आहे. चोवीस तासांत ३ हजार ८१ नवे रुग्ण आढळून आले. सुदैवाने कोरोनामुळे अद्याप कुणाचाही मृत्यू नाही. पॉझिटिव्हिटी रेट ७.५५ टक्के झाला आहे. मुंबईत १९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

केरळमध्ये २ हजार ४१५, दिल्ली- ६५५, कर्नाटक- ५२५, हरियाणा-३२७ नवे रुग्ण आढळले. केरळमध्ये पॉझिटिव्हीटी रेट १३.१९ टक्के आहे. हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

लसीकरणात महाराष्ट्र सरासरीपेक्षाही पिछाडीवर

राज्य - सिंगल डोस - दोन डोस महाराष्ट्र - 74.2% - 60.6% केरळ - 82.1% - 70.2% दिल्ली 91.3% 76.5% कर्नाटक 82.9% 80.3% हरियाणा 82.9% 80.3% तामिळनाडू 78.2% 67% देश 75.9% 67.5% स्रोत: covid19.org.india

बातम्या आणखी आहेत...