आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Number Of Cured In 15 States Is Higher Than The Number Of New Corona Patients

कोरोना देशात:15 राज्यांत बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त, पण मृत्यूचा आकडा कायम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात नव्या रुग्णांची संख्या घटली

कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारचा दिवस दिलाशाचा ठरला. देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली. तथापि, मृत्यूचे आकडे वाढतेच आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा ४,०५० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी महाराष्ट्रातही नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसली. कर्नाटकमध्ये सर्वाधिक म्हणजे ४१,७७९ नवे रुग्ण आढळले. तेथे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३५,८७९ आहे.

दिल्लीमध्ये २३ दिवसांतच संसर्ग दर ३६ वरून १२ टक्के
दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांत सातत्याने घट होत आहे. सुमारे २३ दिवसांपूर्वी २२ एप्रिलला दिल्लीत एका दिवसातील सर्वाधिक ३६.२ च्या संसर्ग दराने २६,१६९ नवे रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, शुक्रवारी हा दर घटून १२ टक्क्यांवर आला. नव्या रुग्णांचाही आकडा ८,५०० वर आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘दिल्लीत १० एप्रिलनंतर प्रथमच १० हजारांपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला सर्वाधिक २८ हजार रुग्ण मिळाले होते. रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या १० दिवसांत रुग्णालयांत ३,००० बेड्स रिकामे झाले आहेत. तथपि, अद्याप आयसीयू बेड्स रिकामे नाहीत. गंभीर रुग्णांची संख्या कायम आहे. दिल्लीत सुमारे १,२०० आयसीयू बेड्स सज्ज झाले आहेत. यामुळे खूप दिलासा मिळेल. कोरोनाला पूर्णपणे नायनाट करण्याआधी आपण सुस्तावलो तर पुन्हा संकट उद्भवू शकते. गेले काही दिवस खूप दुख:दायक ठरले. आपण बऱ्याच दिल्लीकरांचे प्राण वाचवू शकलो नाहीत.

बातम्या आणखी आहेत...