आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Mobile computer Addiction Patients Has Increased Four Times In The Lockdown

सर्व्हे:लॉकडाऊनमध्ये मोबाइल-कॉम्प्युटर व्यसनाधीनतेचे रुग्ण 4 पट वाढले, आठवीपेक्षा कमी वर्गातील मुलांमध्येही येतेय समस्या

नवी दिल्ली धर्मेंद्रसिंह भदौरिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतत टीव्ही बघण्याचे व्यसन वाढले, आधी दहावीपेक्षा मोठ्या मुलांमध्ये जास्त होती समस्या

लॉकडाऊनमध्ये लोकांचे डिजिटल एक्सपोझर वाढले आहे. संगणक-मोबाइल, सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स, वेबसिरीज, चित्रपट, टीव्ही शो, ई-स्पोर्ट््स इत्यादीत लोक वेळ घालवत आहेत. यामुळे विद्यार्थी, युवकांमध्ये मोबाइल-इंटरनेटचे व्यसन वाढले आहे. असे रुग्ण चारपट वाढले आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूसारख्या शहरांप्रमाणेच औरंगाबाद, आग्रा, मेहसाणा, सिक्कीम व मध्य प्रदेश, हरियाणा व राजस्थानच्या लहान शहरातही रुग्ण वाढत आहेत. ही गोष्ट केंद्र सरकारच्या दोन व्यसन उपचार केंद्राच्या मूल्यांकनात दिसून आली. आधी दहावी किंवा त्यापेक्षा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये हे व्यसन जास्त होते. आता आठवी किंवा त्यापेक्षा खालच्या वर्गातील मुले व्यसनाधीन होत आहेत. २२-३५ वर्षांच्या युवकांमध्ये अश्लील कंटेंट बघण्याची सवय वाढली आहे. ब्रिंज वॉचिंग म्हणजे १२० मिनिटांपेक्षा जास्त टीव्ही बघणे वाढले आहे. डिजिटल बर्न आऊट (थकवा), डूम सर्फिंग (कोरोना सर्चिंग) सारख्या समस्या येत आहेत.

बंगळुरूतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (निम्हांस) परिसरातील शट (सर्व्हिसेस फॉर हेल्दी यूज ऑफ टेक्नॉलॉजी) दवाखान्यात २०१४ पासून कार्यरत प्रमुख प्रा. डॉ. मनोजकुमार सांगतात, लॉकडाऊनआधी रोज १-२ रुग्ण यायचे. आता ३-४ रुग्ण संपर्क करताहेत. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) बिव्हेरियल अॅडिक्शन्स क्लिनिकचे कन्सल्टंट इन्चार्ज डॉ. यतन पालसिंह बल्हारा सांगतात, आधी रोज २-३ रुग्ण तपासायचो, आता हा आकडा १० ते १२ झाला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेत ५१% विद्यार्थ्यांनी मान्य केले की, त्यांची गेमिंग सवय वाढली आहे. विद्यार्थी सकाळी आठ ते दुपारपर्यंत लॅपटॉप किंवा मोबाइलवर असतात. एवढा वेळ ते अभ्यास करताहेत हे गरजेचे नाही. बल्हारा सांगतात, महिलादेखील सोशल मीडिया व वेबसिरीज किंवा चित्रपट बघण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत. ४० पेक्षा जास्त वयाचे पुरुष गेम, पोर्न व वेबसिरीज जास्त बघताहेत.

सावधानता : ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावा स्क्रीन एक्सपोझर
एका वेळी ३० मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीनवर राहू नका. जर जास्त वेळ द्यायचा असेल तर प्रत्येक ३० मिनिटांनी १० वेळा पापण्या हलवा. १० वेळा डोके डावे-उजवे आणि वर-खाली करा. मनगटांना घड्याळानुसार आणि उलट फिरवा.

३ गोष्टींतून समजा-तुम्ही डिजिटल व्यसनाधीनतेचे शिकार तर होत नाहीत?
१. सतत तल्लफ लागणे.
२. एकदा वापर केल्यानंतर थांबण्यात अडचण येणे आणि पुन्हा तुम्ही मोबाइल उचलणे.
३. आयुष्यावर परिणाम होत असल्याचे माहीत असूनही खेळणे, झोपणे, खाणे किंवा कुठे तरी जाण्यात उशीर होत असला तरी मोबाइल किंवा स्क्रीन न सोडणे.