आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Number Of Patients Has Increased By 10,000 In The Last 24 Hours, To 3.43 Lakh Cases So Far India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील कोरोना स्थिती:देशात कोरोनामुळे 10,015 मृत्यू; तमिळनाडुत मृतांचा आकडा 500 च्या पुढे, तर दिल्लीत 1400 च्या पुढे मृत्यू

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणा, तेलंगाणा, उत्तर प्रदेशसह देशातील 17 राज्यात मृतांचा वेग वाढला

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 47 हजार 166 एवढी झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत 10,015  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूत मंगळवारी 49 संक्रमितांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील मृतांचा आकडा 528 झाला आहे. दुसरीकडे, हरियाणा देशातील 10वे राज्य बनले आहे, जिथे शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. 

आज या राज्यात झाले इतके मृत्यू

मंगळवारी संध्याकाळपर्यंत 97 संक्रमितांचा मृत्यू झाला. यात गुजरात 28, पश्चिम बंगाल 10, हरियाणा 3, जम्मू काश्मीर 1, राजस्थान 1, आंध्रप्रदेश 2, बिहार 1, उत्तराखंडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.    दिल्लीचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन यांच्या प्रकृती बिघडली आहे. त्यांना ताप आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्याचे वृत्त आहे. त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्र्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...